पुणे : ओम साई विकास प्रतिष्ठान व बी.बी.सी. फिल्म प्रोडक्शन (महाराष्ट्र राज्य) यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय पातळीवरील महाराष्ट्र साई पद्मश्री पुरस्कार सोहळ्याचे आयोजन रविवार, दिनांक २ मे २०२६ रोजी साईबाबांच्या पवित्र भूमीत शिर्डी येथे करण्यात आले आहे. हा सोहळा परिवार लॉन्स, बॅन्क्वेट हॉल, सिटी मार्केट शेजारी, इंडियन पेट्रोल पंपाजवळ आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती कार्यक्रमाचे मुख्य आयोजक, दिग्दर्शक-निर्माते व अभिनेते सुदाम संसारे यांनी दिली.

या पुरस्कार सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी आयोजन समितीचे सर्व पदाधिकारी व सदस्य प्रयत्नशील असून महाराष्ट्र राज्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या सोहळ्यासाठी अध्यक्ष सुदाम संसारे, उपाध्यक्षा विद्या ठाकूर / कुंजिर, कार्याध्यक्ष राजेश काळे, सल्लागार डॉ. माधव वानखेडे, सरचिटणीस शंकरराव कन्हेरकर, विशाल पवार यांच्यासह अभिनेते समाधान बिथरे (छत्रपती संभाजीनगर), सागर बैरागी सहभागी आहेत.

तसेच प्रसिद्धी प्रमुख म्हणून वारकरी मंच प्रदेश प्रसिद्धीप्रमुख व वरिष्ठ पत्रकार रामभाऊ आवारे (वनसगाव, निफाड) कार्यरत असून पत्रकार वजीर शेख (पाथर्डी), उपेक्षित नायक न्यूजचे संपादक भूषण सरदार (अमरावती), डॉ. शाम जाधव (नाशिक), दिपक गरुड, प्रदीप मगरे यांचे सहकार्य लाभत आहे. स्वागताध्यक्ष म्हणून राजनंदिनी अहिरे, कविता वडनेरकर, कविता बाविस्कर, आरती बारवसे, योगिता डांगळे, पायल राजगुरू, प्रीती म्हसदे तर निवेदनाची जबाबदारी अश्विनी सांगळे व अश्विनी पुरी पार पाडणार आहेत.
या पुरस्कारासाठी नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी इच्छुकांनी कार्यक्रमाचे मुख्य आयोजक सुदाम संसारे (मो. ९६८९४६७५०६) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रसिद्धी प्रमुख रामभाऊ आवारे यांनी केले आहे.