निफाड, रामभाऊ आवारे (प्रतिनिधी)

आश्रयआशा फाऊंडेशन, व-हाणे (ता. मालेगाव) या सामाजिक संस्थेच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त राज्यस्तरीय शिवछत्रपती पुरस्कार सन्मान–२०२६ विविध क्षेत्रांतील मान्यवरांसाठी जाहीर करण्यात आल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र पाटील राऊत यांनी दिली.

आश्रयआशा फाऊंडेशन व युवा मराठा महासंघ महाराष्ट्रच्या वतीने संपूर्ण राज्यात विविध सामाजिक उपक्रम राबविले जात असून, या वर्धापन दिनानिमित्त समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात येणार आहे.

त्यानुसार जाहीर करण्यात आलेल्या राज्यस्तरीय शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी पुढीलप्रमाणे आहेत—
रामभाऊ आवारे (अध्यात्मिक व पत्रकारिता) निफाड, जि. नाशिक; भानुदास शेजूळ (सामाजिक व पत्रकारिता) सिंदखेडराजा, जि. बुलढाणा; शत्रुघ्न सूर्यभान निकम (भटक्या-विमुक्तांची चळवळ) माळशिरस, जि. सोलापूर; डॉ. रावसाहेब घोरपडे (वनीकरण) छत्रपती संभाजीनगर; डॉ. चंदनमल बाफना (मूक प्राणीसेवा) संगमनेर, जि. अहिल्यानगर; अभिमन्यू के. गायकवाड (उत्कृष्ट पोलिस सेवा) नाशिक; एकनाथ भोसले (आदर्श सरपंच) डाबली, मालेगाव; अशोक शेवाळे (आदर्श ग्रामपंचायत अधिकारी) नागझरी, मालेगाव; धर्मराज अहिरे (सामाजिक व राजकीय) राजापूरपांडे, ता. बागलाण; तुषार अहिरे (आदर्श ग्रामरोजगार सेवक) डाबली, मालेगाव; दत्तात्रय पांडुरंग डोक (सामाजिक व कोरोना योद्धा) अहिल्यानगर; तसेच सौ. सुमनताई अभिमन्यू गायकवाड (आदर्श महिला सरपंच) रोझे, मालेगाव आदींचा समावेश आहे.
या पुरस्कार सोहळ्यात राज्यभरातील एकूण १५१ व्यक्तींना सन्मानित करण्यात येणार असून, इच्छुक महिला व पुरुषांनी ९८५०४४७६८५ किंवा ९९२३३६२०३० या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

राज्यस्तरीय शिवछत्रपती पुरस्कार सन्मान सोहळा–२०२६ यशस्वी करण्यासाठी संस्थेच्या सचिव श्रीमती आशाताई बच्छाव, उपाध्यक्ष राजेंद्र तुकाराम पवार, खजिनदार प्रशांत बच्छाव, दिपक भावसार, प्रमोद पवार तसेच युवा मराठा महासंघाचे राज्य प्रसिद्धी प्रमुख रामभाऊ आवारे यांच्यासह सर्व पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *