प्रतिनिधी, रामभाऊ आवारे
निफाड : पुणे जिल्ह्यातील मंचर घोडेगाव येथील निखिल कोकणे या शेतकऱ्याने सिन्नर तालुक्यातील वडांगळी येथील श्रीकृष्ण ट्रेलर या ट्रॅक्टर ट्रेलर बनवणाऱ्या कारागिराकडून दीड लाख रुपये किमतीचा नवीन ट्रॅक्टर ट्रॉली खरेदी केली.
८ फेब्रुवारीच्या मध्यरात्री त्यांनी सिन्नर तालुक्यातील वडांगळी येथे येऊन दीड लाख रुपयाची ट्रॅक्टर ट्रॉली खरेदी केली त्यांना वडांगळी, निमगाव फाटा, पंचाळे, नंदुर-शिंगोटे मार्गे नाशिक पुणे मार्गे मंचरला जाण्याचा त्यांचा मार्ग होता .परंतु वडांगळीतून गुगल मॅप वर चुकीचा मार्ग दाखवल्याने ते वडांगळी मनमोडा देवपूर पंचाळा मार्गे ते नांदूर शिंगोटे च्या पुणे नाशिक हायवेवर गेले त्यावेळी त्यांना ट्रॅक्टरचा पाठीमागील ट्रॉलीचे फाळके रस्त्यावर पडल्याचे लक्षात आले. त्यांनी पुन्हा वडांगळी येथे येऊन शोध घेतला.

परंतु त्यांना शोध लागला नाही. त्यावेळी ते वडांगळी मार्गे मानमोड देवपूर मार्गे प्रवास करत असताना देवपूर येथे हायस्कूलच्या लगत असणाऱ्या रस्त्यावरील मोठ्या स्पीड ब्रेकर वर ट्रॉली आढळून ट्रॉलीचा मागील कप्पा ( फाळके ) रस्त्यावर पडला. ते ट्रॅक्टर चालकाच्या लक्षात आले नाही .
या दरम्यान पंचाळे येथील रहिवाशी व दैनिक देशदुत चे पंचाळे येथील पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर बेलोटे व त्यांच्या पत्नी सुजाता बेलोटे गोरख मुहूर्तावरील एका विवाहास उपस्थित राहून पंचाळे येथे मोटरसायकलवर मध्यरात्री रात्री बारा वाजता परतीचा प्रवास करत होते .
देवपूर गावाजवळ प्रवास करत असताना त्यावेळी सौ. बेलोटे यांनी रस्त्यावर काहीतरी वस्तू पडल्याचे आपल्या पतीस सांगितले त्यानंतर गाडी थांबवून बेलोटे यांनी दोघांच्या मदतीने ते ट्रॅक्टरचे फाळके एका ठिकाणी ठेवले व घरी निघून गेले .रात्री एक वाजता बेलोटे यांनी त्यांच्या व्हाट्सअप स्टेटस वर ट्रॅक्टर ट्रॉलीचे फाळके हरवले असल्यास संपर्क करण्याचे कळविले .यावेळी त्यांनी त्यांचा मोबाईल नंबर संपर्कासाठी दिला.

त्यानंतर अनेकांनी फोन करून ट्रॅक्टर फाळके आमचे असल्याचे सांगितले.परंतु प्रत्यक्ष वस्तू आणि हक्कदार यांनी केलेली वर्णन यात विसंगती आढळल्याने बेलोटे यांनी कुणालाच वस्तू कुठे ठेवली आहे याची माहिती दिली नाही. त्यानंतर सकाळी दहा वाजता सिन्नर तालुक्यातील वडांगळी येथील श्रीकृष्ण ट्रेलर चे संचालक सचिन गीते यांनी बेलोटे यांच्याशी संपर्क साधून आपण आपल्या दुकानातून आठ फेब्रुवारी रोजी एक ट्रॅक्टर ट्रॉली पुणे जिल्ह्यातील मंचर घोडेगाव येथे दीड लाख रुपयांना विकल्याचे सांगितले.
त्यानंतर बेलोटे यांनी संबंधित शेतकऱ्याशी मोबाईल वरून संपर्क साधला. यावेळी संबंधित शेतकऱ्यांनी सर्व परिस्थिती कथन केल्यानंतर व ट्रॅक्टरचे पार्ट त्यांचेच असल्याचे खात्री पटल्यानंतर बेलोटे यांनी सचिन गीते यांना देवपूर येथे बोलावले वडांगळी येथील ट्रेलर विक्रेते सचिन गीते देवपूर येथे गाडी घेऊन आले. यावेळी बेलोटे स्वतः देवपूर येथे जाऊन ट्रॅक्टरचे फाळके गाडीमध्ये स्वतः उचलून त्यांच्या गाडीमध्ये ठेवून दिले
.यावेळी सचिन गीते यांनी पत्रकार बेलोटे यांचे आभार मानले. त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल व खरी सामाजिक पत्रकारिता यांचे त्यांनी कौतुक केले. यावेळी आपली पंधरा हजार रुपयाची वस्तू अगदी प्रामाणिकपणे परत मिळाल्याबद्दल त्यांनी बेलोटे यांच्या प्रामाणिक पणाबद्दल कौतुक केले.
जीवनामध्ये पैसा सर्वस्व नसतो माणसाला आयुष्यभर जगण्यासाठी जीवाभावाची माणसे कमी येतात प्रमाणिकपणा हा जीवनामध्ये अमरत्व प्राप्त करतो त्यामुळे ज्यादा हव्यास न करता प्रामाणिकपणे जीवन जगल्यास मनाला खूप आनंद वाटतो. – प्रभाकर बेलोटे पंचाळे सामाजिक कार्यकर्ता