पुणे : गेल्या अनेक वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाल्यामुळे प्रक्षणाचे मोठे संकट उभे राहिले असून जमिनीची धूप प्रमाणापेक्षा जास्त होत असल्याने त्याचा उत्पादकतेवर निश्चित परिणाम होता आहे. यामुळे दुष्काळाचे सावट दिवसेंदिवस वाढत असून या दुष्काळाचा सामना करताना सर्व सजीवांना आटापिटा करावा लागतो हे आपण दैनंदिन व्यवहारात बघतो आहे.
जलसंवर्धनभावी नद्या आटल्या, तसेच त्यांचे नाल्यात रूपांतर झालेले जल, जमीन, जंगल – या तीन गोष्टींचा प्रचंड विनाश झाला. परिणामी अतिवृष्टी, अवर्षण आणि तापमान वाढ अशा आपत्तीचा सामना करावा लागतो आहे. ही आपत्ती नैसर्गिक म्हटले जाते परंतु खरेतर ही मानवनिर्मितच आहे हे विसरून चालणार नाही.

आपणच ओढवून घेतलेल्या आपत्तीतून आपल्याला मार्ग काढावा लागणार असून त्यासाठी जल, जमीन, जंगल त्यांचे संरक्षण आणि संवर्धन शिवाय पर्याय नाही त्या दिशेने व्यापक पातळीवर काम करण्याचा विचार करणे काळाची गरज बनत चालली आहे.
भगवान श्रीकृष्णाने असे सांगितले की, जगात अमर फक्त वृक्षच आहे ते कधी मृत्यू पावत नाहीत कारण त्यांच्या अवतीभोवती त्याच्याच बिया – पडून नवीन झाड उगवत राहते. वृक्षांनी पृथ्वी आणि सत्य कायम राखले आहे यावर नीतिशतक असं म्हणतोय की वृक्ष फार लवति फळ भारी! ताप सांहून देते निवारी! थोर ना करी विभवाचा! हा स्वभाव उपकारी जनांचा! वृक्षांची माहिती या चार ओळी मध्ये अतिशय प्रभावीपणे सांगण्यात आलेली आहे. फळे देणारा, विसावा देणारा, सावली देणारा पृथ्वीवरच्या सर्व प्रकारच्या जीवनाच्या वाढीसाठी हातभार लावणारा निसर्गाचे रक्षण करणारा हा वृक्ष सदैव माणसाच्या मदतीला आला आहे.
मात्र, आपण कृतज्ञतेने आपले जीवन सुरक्षित करणाऱ्या वृक्षावर कुऱ्हाड चालवली तर आपल्या जन्मदात्या वरच वार करण्यासारखे हे आहे पण आपण हे लक्षात घेतले नाही त्यामुळे आज आपल्यासमोर अस्तित्वाचे संकट उभे राहिले आहे.

दुष्काळापासून ते हवामान बदला पर्यंतच्या अनेक अनेक संकटांना आपण आमंत्रण देत आहोत ही संकटे दिवसेंदिवस गंभीर होत आहे आपल्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे या संकटाची तीव्रता कमी करणे आणि पुन्हा सारा आसमंत हिरवागार करणे काळाची गरज आहे.
निसर्गावरच आपले जीवनमान अवलंबून आहे त्यांच्या सानिध्यात च आपण निरोगी जीवन जगू शकतो परंतु विशेष आपल्या सभोवताली असलेले डोंगर, नद्या, झाडे, वेली, पशु, पाखरे यांची साथ-संगत दुर्मिळ होत चालली आहे.
वृक्षतोड आणि त्यामुळे उद्धस्त होत चाललेली होणे यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडला आहे. त्याची झळ आपल्याला मोठ्या प्रमाणात सोसावी लागत आहे, हे चित्र बदलण्यासाठी वृक्ष लागवडीचे जनआंदोलन उभारण्याची वेळ आता आली आहे.
अलीकडच्या काळात निसर्ग चक्र विस्कळीत झाल्याचे आपल्याला अनेकदा जाणवते कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टी कधी गोठवणारी थंडी कधी अक्षरशा: भाजून काढणारं ऊन अशा अनेक बाबींवरून निसर्ग बदलत असल्याचे आणि त्यातूनही निसर्गचक्र बिघडत असल्याचे वारंवार दिसते या बदलांचे दुष्परिणाम कमीअधिक प्रमाणात संपूर्ण जगाला सोसावी लागत आहे ही बाब गांभीर्याने घेतली नाही तर भविष्यकाळात ते अधिक तीव्र बनत जाणार असून आपली शेती पूर्णपणे नैऋत्य मोसमी पावसावर अर्थात मान्सूनवर अवलंबून आहे हे लक्षात घेणे गरजेचे आहे पण हवामान बदलामुळे पावसाची वेळापत्रकही कोलमडले आहे प्रमाण कमी अधिक होते आहे.
रामभाऊ आवारे
महाराष्ट्र राज्य प्रसिद्धी प्रमुख – माय माऊली शिवशक्ती फाउंडेशन (राष्ट्रीय संस्था) महाराष्ट्र राज्य