पुणे : हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती जन्मशताब्दी वर्ष म्हणून २०२५/२६ या वर्षांमध्ये साजरी करण्याचं आयोजन करण्यात आले होते .बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य तसेच फळ वाटप करण्यात आले.

यावेळी बोलताना शिवसेनेचे तालुकाप्रमुख शिवा पाटील सुरासे यांनी सांगितले की ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या उक्तीप्रमाणे १९ जून शिवसेनेची १९६६ साली शिवसेनेची स्थापना झाली. मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी आपला हक्क आयुष्य संघर्षामध्ये घालवणार व्यक्तिमत्व म्हणून बाळासाहेब ठाकरेंची वेगळी ओळख निर्माण झाली .आजही मराठी माणूस मुंबईमध्ये दिमाखामध्ये आपला व्यवसाय करतो. आणि उभा आहे केवळ बाळासाहेब ठाकरेंच्या विचारामुळे.

सर्वसामान्य कार्यकर्ता सत्तेपर्यंत पोहोचवण्याचं काम पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य, आमदार ,खासदार, मंत्री, मुख्यमंत्री विधानसभा अध्यक्ष, लोकसभेचे सभापती हे महत्त्वाच्या पदापर्यंत पोहोचवण्याचं काम बाळासाहेबांचे विचार आयुष्यभर करीत राहिले तसेच शिवसेनेचे संघटक संतोष पानगव्हाणे यांनी बाळासाहेब ठाकरे हा धगधगता विचार होता आजही लाखो लोकांच्या हृदयावर राज्य करणे ही साधी गोष्ट नाही.

राज्यभरात नाही तर देशभरात त्यांची जयंती उत्साह मध्ये साजरी होत आहे. त्यांचे विचार घेऊन मराठी माणूस कायम पुढे जात राहील असे प्रतिपादन केले. यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख शिवा पाटील सुरासे, जिल्हा संघटक बाळासाहेब जगताप ,शहर संघटक संतोष पानगव्हाणे ,निलेश वडनेरे ,उपशहर प्रमुख राहुल वाघ ,विजय विघे ,दीपक सोळसे ,शहाजी ठाकरे, आप्पासाहेब गवळी, निवृत्ती शेळके, प्रवीण पवार ,योगेश बनसोडे ,भाऊराव गरड आदीसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *