पुणे : सामाजिक कार्यात सदैव अग्रस्थानी असलेल्या व दरवर्षी विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा सन्मान करणाऱ्या वसुनंदिनी फाउंडेशन, जामनेरतर्फे राष्ट्रीय प्रेरणा पुरस्कार २०२६ चा भव्य पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. हा सोहळा ५ एप्रिल २०२६ रोजी अल्पबचत हॉल, कलेक्टर ऑफिस, आकाशवाणी चौक, जळगाव येथे होणार आहे.

देशभरातील सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, कृषी, सहकार, औद्योगिक, वैद्यकीय, प्रशासकीय, पत्रकारिता (वृत्तपत्र, इलेक्ट्रॉनिक/डिजिटल मीडिया), युवक, महिला, क्रीडा, साहित्य, कला, पर्यावरण, ग्रामविकास आदी क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या संस्था व मान्यवर व्यक्तींना या प्रसंगी सन्मानित करण्यात येणार आहे.

या पुरस्कार सोहळ्यात डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम राष्ट्रीय प्रेरणा पुरस्कार–२०२६, पद्मश्री डॉ. सिंधुताई सपकाळ (माई) महाराष्ट्र समाज रत्न पुरस्कार–२०२६, तसेच समाज रत्न, समाज भूषण, आदर्श व्यक्तिमत्त्व, आदर्श ग्राम, जीवनगौरव व इतर विशेष कार्य सन्मान प्रदान करण्यात येणार आहेत. पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व पदक असे असणार आहे.

या पुरस्कारांसाठी इच्छुकांनी आपले प्रस्ताव कार्यक्रमाच्या मुख्य आयोजक माधुरी कुलकर्णी (संस्थापिका-सचिव, वसुनंदिनी फाउंडेशन) मोबा. ९५१८७७०३६७ किंवा पुरस्कार सोहळा प्रसिद्धी प्रमुख रामभाऊ आवारे, निफाड मोबा. ८७८८५०४५१२ यांच्याकडे सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *