पुणे : ग्रामस्वच्छतेचा संदेश कृतीतून देत उरुळी कांचन येथील उन्नती कन्या विद्यालय (Affiliation No. 1131458) या Central Board of Secondary Educathion संलग्न इंग्रजी माध्यमाच्या शाळेत राष्ट्रसंत गाडगेबाबा जयंतीनिमित्त ग्रामस्वच्छता अभियान मोठ्या उत्साहात राबविण्यात आले.

उरुळी कांचन पंचक्रोशीमध्ये फक्त मुलींची शाळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या विद्यालयातील विद्यार्थिनींनी स्वच्छतेचा संदेश गावागावांत पोहोचविला.
कार्यक्रमाची सुरुवात संत गाडगेबाबांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.

त्यानंतर विद्यार्थिनींनी मुख्य बाजारपेठ, ग्रामपंचायत परिसर, महादेव मंदिर परिसर, राम मंदिर तसेच आश्रम रोड या ठिकाणी जाऊन स्वच्छता मोहीम राबविली. परिसरातील कचरा गोळा करून स्वच्छता करत नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले.

“स्वच्छ गाव, सुंदर गाव” हा संदेश देत विद्यार्थिनींनी ठिकठिकाणी पथनाट्ये सादर केली. त्यांच्या प्रभावी सादरीकरणामुळे उपस्थित नागरिकांची मने जिंकली.

शाळेचे आधारस्तंभ श्री. सुरेश तात्या कांचन, अध्यक्षा नयना कांचन व संचालिका डॉ. नुपूर कांचन यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्राचार्या पद्मादेवी विडप यांच्या निरीक्षणाखाली हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला. शिक्षकवृंद व विद्यार्थिनींच्या एकजुटीमुळे संपूर्ण परिसर स्वच्छ आणि प्रसन्न झाला.

या स्तुत्य उपक्रमाबद्दल उरुळी कांचन ग्रामपंचायतीतर्फे सर्व विद्यार्थिनी व शाळेचे विशेष आभार मानण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत स्वच्छतेचा वसा जपणाऱ्या उन्नती कन्या विद्यालयाच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *