पुणे : उरुळी कांचन जिल्हा परिषद गटात भाजपचे अधिकृत उमेदवार शंकर बडेकर यांच्या प्रचाराला दिवसेंदिवस जोर चढताना दिसत आहे. गावोगावी होत असलेल्या भेटी, संवाद दौरे आणि प्रचार सभांना ग्रामस्थांकडून मोठ्या प्रमाणात उस्फुर्त प्रतिसाद मिळत असून, बडेकर यांच्या विजयाची चर्चा आता खुलेआम सुरू झाली आहे.

शंकर बडेकर हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक आणि विकासात्मक कामांत सक्रिय असून, “काम बोलते” हीच त्यांची ओळख आहे. रस्ते, पाणीपुरवठा, वीज, आरोग्य व शिक्षण यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर त्यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याने नागरिकांमध्ये त्यांच्याविषयी विश्वास निर्माण झाला आहे. हाच विश्वास आता मतदानातून व्यक्त होणार असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.

प्रचारादरम्यान ग्रामस्थ स्वतःहून पुढे येत बडेकर यांचे स्वागत करत आहेत. कुठे फेटे बांधून तर कुठे हार-तुरे अर्पण करून नागरिकांनी आपला पाठिंबा जाहीर केला आहे. “नेतृत्व नव्हे, तर कर्तृत्व हवे” अशी भावना नागरिकांत दिसून येत असून, बडेकर हेच या गटासाठी योग्य उमेदवार असल्याचा सूर सर्वत्र ऐकायला मिळतो आहे.

भाजप सरकारच्या विकासाभिमुख धोरणांची माहिती देत शंकर बडेकर यांनी भविष्यातील स्पष्ट विकास आराखडा ग्रामस्थांसमोर मांडला आहे. “हा विजय माझा नसून जनतेचा असेल” अशी ठाम भूमिका त्यांनी मांडत, प्रत्येक घटकाला सोबत घेऊन काम करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

एकूणच उरुळी कांचन जिल्हा परिषद गटात भाजपचा प्रचार वेग पकडत असून, शंकर बडेकर यांना मिळणारा वाढता जनसमर्थन हा विरोधकांसाठी धोक्याची घंटा ठरत आहे, एवढे मात्र नक्की!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *