पुणे : निफाड तालुक्यातील महिला पत्रकार, नीलांजनम बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या सदस्या तसेच निफाड तालुका महिला वारकरी मंचच्या प्रदेश प्रसिद्धीप्रमुख ज्योती राजेंद्र आहेर (खेरवाडी, ता. निफाड) यांची राष्ट्रीय नोंदणीकृत माय माऊली शिवशक्ती फाऊंडेशनच्या नाशिक जिल्हा महिला उपाध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली आहे.

ही नियुक्ती १ जानेवारी २०२६ ते ३१ डिसेंबर २०२६ या कालावधीसाठी करण्यात आली असून, याबाबतची माहिती फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष व सचिव डॉ. संदीप काकड , राष्ट्रीय महिला अध्यक्ष सौ. रेखा संदीप काकड तसेच राष्ट्रीय कार्याध्यक्ष इंजिनिअर साहिल काकड यांनी दिली.

निवडपत्रात नमूद करण्यात आले आहे की, सामाजिक, शैक्षणिक, कायदेशीर, वैद्यकीय, अध्यात्मिक, सांस्कृतिक, आरोग्य, क्रीडा, कृषी व सहकार क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन ही नियुक्ती करण्यात आली आहे. संस्थेच्या ध्येय-धोरणानुसार व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करून संस्थेचा नावलौकिक वाढविण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
लोकसेवा, निसर्गसेवा तसेच संस्थेच्या विविध उपक्रमांच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी त्या प्रामाणिकपणे कार्य करतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. या निवडीबद्दल माय माऊली शिवशक्ती फाऊंडेशनच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी ज्योती आहेर यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.