रामभाऊ आवारे प्रतिनिधी
निफाड : वसुनंदिनी फाउंडेशन जामनेर आयोजित राष्ट्रीय प्रेरणा पुरस्कार २०२६ चे पुरस्काराचे जळगाव येथे ५ एप्रिल २०२६ रोजी आयोजन करण्यात आले असून देशभरातील सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, कृषी, सहकार, औद्योगिक, वैद्यकीय, प्रशासकीय, पत्रकारिता (वृत्तपत्र, इलेक्ट्रॉनिक/डिजिटल मिडिया), युवक, महिला, क्रीडा, साहित्यिक, कला, पर्यावरण, ग्रामविकास आदी. क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या संस्था व मान्यवर व्यक्तींचा विशेष कार्य सन्मान पुरस्कार सोहळा अल्पबचत हॉल कलेक्टर ऑफिस आकाशवाणी चौक जळगाव येथे आयोजन करण्यात आले आहे.

डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम राष्ट्रीय प्रेरणा पुरस्कार-२०२६,पद्मश्री डॉ. सिंधुताई सपकाळ (माई), महाराष्ट्र समाज रत्न पुरस्कार-२०२६, समाज रत्न / समाज भुषण / आदर्श व्यक्तीमत्व /आदर्श ग्राम / जीवनगौरव व इतर पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

सदर कार्यक्रमात सन्मान चिन्ह, सन्मान पत्र आणि पदक असे पुरस्काराचे स्वरूप असुन इच्छुकांनी आपला प्रस्ताव कार्यक्रमाचे मुख्य आयोजक माधुरी कुलकर्णी संस्थापिका सचिव वसुनंदिनी फाउंडेशन मोबाईल नंबर ९५१८७७०३६७ व पुरस्कार सोहळा प्रसिद्धी प्रमुख रामभाऊ आवारे निफाड मोबाईल नंबर ८७८८५०४५१२ यांच्याकडे विविध राष्ट्रीय व राज्यस्तरीय सोशल / सामाजिक पुरस्कारांसाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन करण्यात येत आहे.