प्रतिनिधी, रामभाऊ आवारे

निफाड : स्वराज्य पोलिस मित्र पत्रकार संरक्षण व माहिती अधिकार संघटना पंढरपूर शहर व तालुका यांच्याकडून संघटनेचे संस्थापक महासचिव श्री. कमलेश शेवाळे यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरपुरात वृक्षारोपणाचा व विठ्ठलाच्या पूजेचा उपक्रम राबविण्यात आला आहे.

स्वराज्य पोलिस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेचे महासचिव देवा उर्फ कमलेश शेवाळे यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर शहर व तालुका तसेच पश्चिम महाराष्ट्र कार्यकारिणीच्या वतीने वृक्षारोपणाचा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.

हा कार्यक्रम पद्मावती तलाव ट्रॅक जवळील ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्याच्या ठिकाणालगत आयोजित करण्यात आला. पर्यावरण संवर्धन व सामाजिक जबाबदारीचे भान ठेवत हा उपक्रम राबविण्यात आला असून, शहराच्या पर्यावरण संतुलनासाठी तो उपयुक्त ठरणार आहे.

या वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन तालुकाध्यक्ष प्रवीण सुरवसे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. यावेळी लक्ष्मण अभंगराव, आलदर, नागेश राहीलकर यांच्या विशेष पुढाकारातून कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. संघटनेचे विश्वस्त, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष धनश्री उत्पाद यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राम बडवे व उपाध्यक्ष कैलास कारंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.

कार्यक्रमास संघटनेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमानंतर देवा उर्फ कमलेशजी शेवाळे यांना दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य व यश लाभावे, यासाठी विश्व मालक श्रीविठ्ठलाच्या चरणी प्रार्थना पंढरपूर तालुका सहसचिव श्री लक्ष्मण अभंगराव यांच्या हस्ते पूजा करून प्रार्थना करण्यात आली.

सदर कार्यक्रमासाठी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा धनश्री उत्पात पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राम बडवे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष कैलास कारंडे पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष श्री उमेश ढोबळे पश्चिम महाराष्ट्र संघटक विजय वाघमारे, पंढरपूर तालुकाध्यक्ष प्रवीण सुरवसे, तालुका महिला अध्यक्ष शोभा बडवे, तालुका उपाध्यक्ष नागेश राहिरकर, पंढरपूर तालुका उपाध्यक्ष सुवर्णा कुरनावळ , प्रकाश आलदर, लक्ष्मण अभंगराव, अजित धतींगे, रवी वाळके हे पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *