पुणे : थेऊर (ता. हवेली) येथील मातोश्री रमाई आंबेडकर प्राथमिक व माध्यमिक निवासी आश्रम शाळेत समाजसेवक किरण भंडारी यांनी आपला वाढदिवस साधेपणाने साजरा करत विद्यार्थ्यांसाठी अन्नदान केले. वाढदिवसानिमित्त होणारा अनावश्यक खर्च टाळून तो समाजोपयोगी कार्यासाठी वापरण्याचा आदर्श त्यांनी यावेळी घालून दिला.

आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना पौष्टिक जेवण देण्यात आले. अन्नदानावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान दिसून येत होते. समाजातील प्रत्येकाने वैयक्तिक आनंदाचे क्षण सामाजिक बांधिलकी जपत साजरे करावेत, असे मत किरण भंडारी यांनी व्यक्त केले.
शिक्षण घेणाऱ्या व गरजू घटकांसाठी केलेले असे उपक्रम समाजाला दिशा देणारे ठरतात, असेही त्यांनी नमूद केले.

या कार्यक्रमास इतिहास अभ्यासक खलील शेख, पै. शुभम भैय्या काळे, अनिकेत पवार, गोवर्धन खोमणे, प्रवीण ननावरे, कार्यक्रमाचे निवेदक समाधान अवचट, केतन निकाळजे, नितिन लोंढे, अमित कांबळे, नितीन डाके, अक्षय काळे, अविर घाडवे, समाधान वाघमारे, पत्रकार अमोल भोसले, बापुराव चौधरी, सुनील तुपे आदी मान्यवर उपस्थित होते.
सर्व उपस्थितांनी किरण भंडारी यांच्या उपक्रमाचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या. शाळेच्या प्रशासनाच्या वतीने भंडारी यांचे आभार मानण्यात आले. अशा सामाजिक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये संवेदनशीलता, माणुसकी आणि समाजभान विकसित होण्यास मदत होते, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.