पुणे. : स्वराज्य फिल्म प्रॉडक्शन, आंतरराष्ट्रीय मानव अधिकार न्यायिक सुरक्षा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने चित्रपट सृष्टीचे जनक कलावंत दादासाहेब फाळके व सह्याद्री रत्न पुरस्कार महंत.श्री.गोपालव्यास कपाटे महानुभाव यांना नुकताच पुणे येथे आचार्य अत्रे सभागृह पिंपरी चिंचवड येथे मोठ्या दिमाखात सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख अतिथी यांनी महंत.श्री.गोपालव्यास कपाटे यांच्या कार्याचा गौरव करून उपस्थितांसमोर कार्य कर्तृत्वाचा लेखा जोगा मोठ्या दिमाखात सादर केला.

उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात महंत.श्री.गोपालव्यास याचे तोंड भरुन कौतुक केले व पुढील कार्यासाठी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी सत्कारास उत्तर देतांना महंत.गोपालव्यास म्हणाले गेली पंचवीस तीस वर्षापासून निरपेक्षवृतीने अध्यात्मिक, सामाजिक, अंधश्रद्धा,कर्मकांड, राष्ट्रीय एकात्मता,जातीभेद निर्मूलन, वंचित घटक, इत्यादी क्षेत्रात काम करीत असतांना अनेक चांगले वाईट अनुभव येत असतात परंतु त्या कार्यात सातत्य टिकवणे महत्वाचे असते आणि म्हणून ह्या विश्वात आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, तथा

राज्यस्तरीय अशा अनेक संस्था,समित्या,संघटना,असे अनेक माध्यमातून कर्तृत्व, नेतृत्व, प्रभुत्वांचा या सन्मानाच्या माध्यमातून कौतुक होत असते आजपर्यंत अनेक राष्ट्रीय, राज्यस्तरीय पुरस्काराने मला सन्मानित केले आहेत पण कलावंत दादासाहेब फाळके पुरस्काराने ज्या माध्यमांनी मला सन्मानित केले त्यांचे मी मनापासून आभार मानतो व धन्यवादही देतो…

विषेश म्हणजे मला ज्या पुरस्काराने सन्मानित केले तो पुरस्कार सन्मानपूर्वक श्री चक्रधर स्वामींच्या श्रीचरनी विनम्रपुर्वक समर्पित करतो याप्रसंगी महाराष्ट्र राज्यातून तथा परराज्यातून मोठ्या प्रमाणात मान्यवरांची उपस्थिती लाभली या सोहळ्यात अनेकांनी विविध क्षेत्रातील प्रमुख मान्यवरांनी महंत.श्री.गोपालव्यास यांचे तोंड भरुन कौतुक करून अभिनंदन व शुभेच्छा देवून पुढील वाटचालीस हार्दिक शुभकामना दिल्यात कार्यक्रम अतिशय उत्साहात संपन्न झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *