संभाजी पुरीगोसवी, प्रतिनिधी
पुणे : नांदेडमध्ये १६ वर्षीय दहावीच्या विद्यार्थिनीने मोबाईल मधील फोटो व्हायरल करण्याच्या धमकीमुळे गळफास घेवुन आत्महत्या केल्याची घटना भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडली आहे.

या प्रकरणी तरुणांसह पाच जणांविरोधात आत्महत्या प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किनवट तालुक्यांतील अंधबोरी येथील दोन बहिणी शिक्षणासाठी नांदेड शहरांतील पंढरपूर नगर येथे भाड्याने राहत होत्या. मृतक अल्पवयीन मुलगी ही दहावीत शिक्षण घेत होती. यात गोकुंदा येथील दीपक साळुंखे यांच्यासोबत ओळख झाली तेव्हा या दोघांनी एकत्रित फोटो काढले

होते. दोघेही फोनवर बोलत होते. मात्र काही कारणांस्तव पीडित मुलीने त्याच्याशी बोलणे बंद केले, त्यानंतर दीपक ने लग्नास आणि बोलण्यास भाग लावत असे आणि जर होकार दिला नाही तर एकत्रित असलेले फोटो व्हायरल करतो अशी धमकी देत होता.
दरम्यान, आरोपी दीपकचा चुलत भाऊ पवन साळुंखे हा देखील मृत मुलीच्या बहिणीला फोटो व्हायरल करण्याची धमकी देत होता. दरम्यान आपली बदनामी होणार या भीतीने अल्पवयीन मुलीने २३ फेब्रुवारी रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारांस खोलीत
ओढणी बांधून गळफास घेतला. या प्रकरणी मृत मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून भाग्यनगर पोलिसांनी तरुणासह पाच जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विष्णू साळुंखे, पवन साळुंखे, करण साळुंखे, विष्णू साळुंखे उत्तम साळुंखे अशी त्यांची नावे आहेत.