पुणे : कुंजीरवाडी (ता. हवेली) मौजे कुंजीरवाडी येथील थेऊरफाटा ते आंबेकरमळा-चौरेवस्ती दरम्यान गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेला ड्रेनेज लाईनचा प्रश्न अखेर निकाली निघाला असून या कामासाठी १० लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. तसेच धुमाळमळा येथील अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरणासाठीही १० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून दोन्ही कामांना उद्यापासून प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे.

आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांच्या मार्गदर्शनाखाली हा निधी उपलब्ध झाला आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीदरम्यान हवेली पंचायत समितीचे नवनिर्वाचित सदस्य युवराज हिरामण काकडे यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती या दोन्ही जागा निवडून आल्यानंतर एका महिन्याच्या आत प्रलंबित कामे मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार अवघ्या महिन्याभरात दोन्ही कामांना सुरुवात होत असल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य सौ. कोमल संदेश आव्हाळे, हवेली पंचायत समितीचे सदस्य युवराज हिरामण काकडे, माजी सरपंच संतोष कुंजीर पाटील, सचिन तुपे, माजी उपसरपंच सुरेश कुंजीर, चंद्रकांत मेमाणे, दत्तात्रय कुंजीर, विकास निगडे, गोकुळ ताम्हाणे, शिवाजी कुंजीर, भरत निगडे, नयन तुपे, योगेश गायकवाड, दिपक ताम्हाणे, कैलास तुपे, पोलीस पाटिल मिलिंद कुंजीर, तंटामुक्ती अध्यक्ष बापूसो घुले, संभाजी गायकवाड, मुकेश गायकवाड, प्रकाश धुमाळ, नंदकुमार धुमाळ, दिलीप

आंबेकर, विश्वनाथ गाढवे, सुभाष कुंजीर, रामदास कुंजीर, दादासो काकडे, संतोष शिंदे, अविनाश धुमाळ, स्वप्नील काळभोर, सोमनाथ धुमाळ, विकास धुमाळ, निर्मलाताई धुमाळ, गोरख तुपे, नवनाथ आंबेकर, विशाल धुमाळ, अमोल धुमाळ, सतीश कुंजीर, गौरव कुंजीर, अमर कुंजीर, संदीपआबा धुमाळ, बाबा धुमाळ, माऊली सावंत आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कुंजीरवाडीसह जिल्हा परिषद गटातील सर्व गावांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे संदेश आव्हाळे व युवराज काकडे यांनी यावेळी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *