पुणे : नवनगर शिक्षण मंडळ आकुर्डी संचालित सरस्वती प्राथमिक विद्यामंदिर, उरुळी कांचन येथे वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन शाळेच्या प्रांगणात करण्यात आले. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रात कार्य करणारे मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाला ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शिवाजी कांचन, उरुळी कांचन ना.स. पतसंस्थेचे संचालक, पंचायत समिती सदस्या कोमल कांबळे, ज्येष्ठ समाजसेवक व प्रवचनकार डॉ. रवींद्र भोळे, सामाजिक कार्यकर्ते शुभम काळे, पूजा सणस (अध्यक्ष, भाजप महिला युवा आघाडी), बापूसो कदम, राजेंद्र बारंगुळे, पत्रकार सुनील तुपे तसेच मुख्याध्यापक दत्तात्रय कुंजीर व्यासपीठावर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात मुख्याध्यापक दत्तात्रय कुंजीर यांनी प्रास्ताविकाने केली. यावेळी उपस्थित मान्यवरांचा विशेष सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शन, राष्ट्रभक्तीपर गीते तसेच महाराष्ट्रातील लोकधारा गीते सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

या कार्यक्रमाला संजय कुंजीर, किरण तळले, अमोल कुंजीर, मनीषा मेमाणे, स्मिता तोडकरी, लता चव्हाण, लीना धिवार, श्वेता देवरे आणि दिपाली बोडरे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल कुंजीर व मनीषा मेमाणे यांनी केले. कार्यक्रम शाळेच्या प्रांगणात उत्साहात संपन्न झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *