बापुराव चौधरी, उपसंपादक

पुणे : पाषाण–बाणेर लिंक रोड येथे नुकत्याच  सुरू झालेल्या  पासपोर्ट सेवा केंद्राच्या पार्श्वभूमीवर वाहतूक व परिसर व्यवस्थापनाबाबत संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली आहे.

ही संयुक्त बैठक येत्या ८ एप्रिल १०२६ रोजी सकाळी ११ वाजता औंध रोड क्षेत्रिय कार्यालयात होणार असल्याची  माहिती नगरसेववक चंद्रशेखर उर्फ सनी निम्हण यांनी दिली.  

नगरसेवक सनी निम्हण यांनी संबंधित विभागांना पाठवलेल्या पत्रव्यवहार व सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ही बैठक आयोजित करण्यात आली असून, संभाव्य वाहतूक कोंडी, पार्किंगची समस्या, अतिक्रमण तसेच परिसर व्यवस्थापनाच्या अडचणी टाळण्यासाठी विविध उपाययोजनांवर चर्चा होणार आहे.

या बैठकीस महापालिका, वाहतूक पोलिस आणि सर्व संबंधित विभागांचे अधिकारी सहभागी होणार आहेत. या  परिसरातील नागरिकांनी या बैठकीस उपस्थित राहून सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन निम्हण यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *