बापुराव चौधरी, उपसंपादक
पुणे : डॉ. अण्णा भाऊ साठे क्रांती सेनेच्या पुणे जिल्ह्यात संघटन वाढीसाठी जोरदार हालचाली सुरू असून पक्षश्रेष्ठी सचिन भाऊ साठे यांच्या आदेशानुसार जिल्हाभर संघटन उभारणीला वेग आला आहे.

पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजाभाऊ आढागळे, पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडी अध्यक्ष उषा खिलारे आणि युवा पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्ष रूपाली आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पुणे जिल्हाध्यक्ष विलास झोंबाडे, पुणे जिल्हा युवा अध्यक्ष अनिल कांबळे आणि पुणे जिल्हा महिला अध्यक्ष पिंकी गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली संघटन बळकटीकरणाचे प्रयत्न सुरू आहेत.

या पार्श्वभूमीवर ४ एप्रिल २०२६ रोजी हॉटेल सोनाई येथे महिला आघाडी व युवा आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. पुणे जिल्ह्यात महिला संघटन वेगाने वाढत असल्याचे यावेळी स्पष्ट झाले.
महिला आघाडीत पुणे जिल्हा सचिवपदी स्मिता जाधव, जिल्हा महिला संपर्कप्रमुखपदी आरती वाघमारे, दौंड तालुका अध्यक्षपदी वैशाली शिंदे आणि उरुळी कांचन महिला शहराध्यक्षपदी प्रतिमा लोणारी यांची नियुक्ती करण्यात आली.
युवा आघाडीत हवेली तालुका अध्यक्षपदी अविनाश साबळे, उरुळी कांचन शहराध्यक्षपदी माऊली राजगुरू तसेच शहर उपाध्यक्षपदी अतुल पाटोळे यांची निवड करण्यात आली.
या कार्यक्रमाचे आयोजन हवेली तालुका अध्यक्ष भारत लोणारी यांनी केले होते. कार्यक्रमाला पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजाभाऊ आढागळे, पश्चिम कोर कमिटी अध्यक्ष केरबा बाबर, पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्ष उषा खिलारे, पुणे जिल्हाध्यक्ष विलास झोंबाडे, पुणे जिल्हा युवा अध्यक्ष अनिल कांबळे, पुणे जिल्हा महिला अध्यक्ष पिंकी गायकवाड यांच्यासह किरण कसबे, विकी अडागळे आणि चंद्रकांत गुरव उपस्थित होते.
नवीन नियुक्त पदाधिकाऱ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत असून “अण्णाभाऊ साठे क्रांती सेना ही एक संघटना नसून एक कुटुंब आहे” अशी भावना नव्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.