बापुराव चौधरी, उपसंपादक
पिंपरी : कुटुंबाच्या प्रगतीसाठी महिलांना अनेक गोष्टींचा त्याग करावा लागतो. त्यामुळे केवळ वर्षातून एकदाच ८ मार्च रोजी महिला दिन साजरा करण्यापेक्षा दररोज महिलांना मान, सन्मान आणि आदर देणे अधिक महत्त्वाचे आहे. महिलांच्या त्यागामुळेच कुटुंब आणि देशाची प्रगती होत असल्याचे प्रतिपादन पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या उपमहापौर शर्मिला बाबर यांनी केले.

पिंपरी-चिंचवड महिला पत्रकार संघाच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त मंगळवारी (ता. २८) स्नेहमेळावा तसेच नवनिर्वाचित नगरसेविका, बचत गटांच्या अध्यक्षा आणि महिला पत्रकारांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी त्या बोलत होत्या.

या प्रसंगी स्थायी समितीचे अध्यक्ष अभिषेक बारणे, पक्षनेते प्रशांत शितोळे, नगरसेविका सारिका मासुळकर, शितल वर्णेकर, सुप्रिया चांदगुडे, वर्षा जगताप, अनुराधा गोरखे, शालिनी गुजर, अर्चना सस्ते, रवीना आंगोळकर, सुजाता बोराटे, स्नेहा कलाटे, तृप्ती कांबळे, शिवानी नरळे आदी उपस्थित होते. तसेच महिला पत्रकार संघाच्या अध्यक्ष अर्चना मेंगडे, श्रद्धा प्रभुणे, सायली कुलकर्णी, माधुरी कोराड,

मंदा बनसोडे, प्राजक्ता जाधव, श्रद्धा कोतवडेकर, लीना माने यांच्यासह ज्येष्ठ पत्रकार माधव सहस्त्रबुद्धे, बाळासाहेब ढसाळ, नाना कांबळे, अनिल कातळे, प्रवीण शिर्के, देवा भालके, सुनील उर्फ बाबू कांबळे, अविनाश कांबीकर, विनय लोंढे, दिनेश दुधाळ, रोहित खर्गे, विशाल जाधव आदी उपस्थित होते.
कार्यक्रमात महिला पत्रकार संघाच्या वतीने सर्व नगरसेविका, बचत गटांच्या अध्यक्षा, सामाजिक कार्यकर्त्या व ज्येष्ठ पत्रकारांचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह आणि तुळशीचे रोप देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी अभिषेक बारणे, प्रशांत शितोळे, नाना कांबळे आणि बाळासाहेब ढसाळ यांनीही महिलांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे स्वागत अर्चना मेंगडे यांनी केले. सूत्रसंचालन संदीप साकोरे यांनी केले, तर आभार श्रद्धा प्रभुणे यांनी मानले.