सुवर्णा कांचन मुख्य संपादक

पुणे : बीड येथील श्री जगतगुरु संत तुकाराम महाराज शास्त्रीय गायन, वादन, नृत्य आंतरराष्ट्रीय शास्त्रीय संगीत महाविद्यालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या साने संगीत विद्यालयाला आंतरराष्ट्रीय शास्त्रीय संगीत परीक्षा केंद्र म्हणून मान्यता मिळाली आहे. परिसरातील हे पहिलेच आंतरराष्ट्रीय शास्त्रीय संगीत परीक्षा केंद्र ठरले आहे.

उत्कृष्ट संगीत शिक्षण आणि योग्य मार्गदर्शनामुळे साने संगीत विद्यालयाने अल्पावधीतच नावलौकिक मिळविला आहे. विद्यार्थ्यांची परीक्षा पूर्वतयारी नियोजनबद्ध पद्धतीने करून घेतल्यामुळे त्यांना परीक्षेला सामोरे जाताना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागला नाही.

या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना इयत्ता दहावीच्या परीक्षेत वाढीव गुण मिळण्याची तरतूद आहे. विद्यार्थ्यांना दर्जेदार संगीत शिक्षणाबरोबरच शैक्षणिक प्रगती साधता यावी, यासाठी शिवराज साने यांचे सातत्याने प्रयत्न असतात.
विद्यालयात वर्षभर केवळ संगीत शिक्षणच दिले जात नाही, तर विविध उपक्रमांचे आयोजनही केले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळते.

जगतगुरु संत तुकाराम महाराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष अभिमान राजळकर, उपाध्यक्ष बळीराम पवळ, सचिव जी. एम. पवळ, परीक्षा विभाग प्रमुख गया केदार आणि राजेश केदार यांच्या सहकार्यामुळे साने संगीत विद्यालयाला परीक्षा केंद्राची मान्यता प्राप्त झाली. तसेच परीक्षा केंद्राची मान्यता मिळवून देण्यासाठी म्युझिक अकॅडमीचे संचालक सुधीर चव्हाण यांचे विशेष सहकार्य लाभले.

बापुराव चौधरी उपसंपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *