पुणे : उरुळी कांचन जिल्हा परिषद गटासाठी भाजपाने अधिकृत उमेदवार म्हणून शंकर उत्तम बडेकर यांची उमेदवारी जाहीर करताच परिसरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. उरुळी कांचन ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य असलेल्या बडेकर यांनी गेल्या अनेक वर्षांत लोकहिताचे काम करत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यामुळेच ही उमेदवारी म्हणजे केवळ पक्षाचा निर्णय नसून, जनतेच्या विश्वासावरची मोहोर असल्याचे बोलले जात आहे.

गाव व परिसरातील रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि सार्वजनिक सुविधांच्या विकासासाठी बडेकर यांनी सातत्याने पाठपुरावा केला. खराब रस्त्यांमुळे त्रस्त ग्रामस्थ असोत वा पाणीटंचाईचा प्रश्न, प्रत्येक मुद्द्यावर त्यांनी आक्रमक भूमिका घेत प्रशासनाला हलवले. “काम बोलतं, बाकी फोल घोषणा नाहीत,” हीच त्यांची ओळख बनली आहे.
शेतकरी हा बडेकर यांच्या राजकारणाचा केंद्रबिंदू राहिला आहे. शेतमालाला योग्य दर मिळावा, आधुनिक शेतीविषयक मार्गदर्शन मिळावे आणि शासकीय योजनांचा थेट लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावा यासाठी त्यांनी सातत्यपूर्ण प्रयत्न केले. अनेक शेतकऱ्यांना योजना समजावून देत प्रत्यक्ष लाभ मिळवून देण्यात त्यांचा पुढाकार निर्णायक ठरला आहे.

युवकांसाठी शिक्षण, क्रीडा आणि रोजगारविषयक उपक्रम राबवत त्यांनी तरुणांना सकारात्मक दिशेने वळवण्याचे काम केले. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, खेळासाठी सुविधा आणि रोजगार संधींबाबत जनजागृती हे त्यांचे ठळक काम मानले जाते.
सामाजिक सलोखा, एकोपा आणि सहकार्य वाढवण्यासाठी विविध सामाजिक उपक्रम राबवत बडेकर यांनी सर्व समाजघटकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. लोकहितासाठी जनजागृती व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन ही त्यांची खास ओळख आहे.
एकूणच, उरुळी कांचन जिल्हा परिषद गटात भाजपाने शंकर बडेकर यांच्या रूपाने मजबूत आणि कामगिरीवर विश्वास असलेला उमेदवार मैदानात उतरवला असून, ही लढत चुरशीची होणार हे नक्की.