जळगाव येथे ५ एप्रिल रोजी पुरस्कार वितरण सोहळा

प्रतिनिधी, रामभाऊ आवारे

निफाड : पत्रकारिता क्षेत्रात तीन दशकांपासून अधिक काळ विविध वृत्तपत्रांच्या माध्यमातून पत्रकारिता करत असलेले तसेच अद्याप पावेतो अनेक राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले जेष्ठ पत्रकार, वारकरी संप्रदायाचे स्टार प्रचारक व प्रसारक ,द युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष, वारकरी मंच प्रदेश प्रसिद्धीप्रमुख, दैनिक युवा मराठा राज्य प्रसिद्धी प्रमुख, महानगर पत्रकार परिषद कार्यकारी सदस्य तसेच वनसगाव तालुका निफाड येथील रामभाऊ विठ्ठलराव आवारे सर यांना पत्रकारिता , सामाजिक व जनहिताच्या कार्यातील उल्लेखनीय योगदानाबद्दल जळगाव येथे वसुनंदिनी फाउंडेशन, जामनेर यांच्या वतीने अध्यात्मिक व पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल डॉ ए पी जे अब्दुल कलाम प्रेरणा पुरस्कार जाहीर झाला आहे अशी माहिती वसुनंदीनी फाऊंडेशन जामनेर चे संस्थापक अध्यक्ष विद्याधर सोनवणे व संस्थापक सचिव माधुरी कुलकर्णी यांनी दिली आहे.

या निवडपत्रात असे म्हटले आहे की,”वसुनंदिनी फौंडेशन” (रजि.) हि सामाजिक बांधिलकी राखुन काम करणारी संस्था आहे. महाराष्ट्रामध्ये निर्भीड, सक्षम, कार्यक्षमतेने वावरणाऱ्या आपल्या समाजातील उत्कृष्ठ कला, क्रीडा, सामाजिक, राजकीय, पत्रकारिता, शिक्षक, उद्योग, संस्कृती, कर्तव्य दक्ष डॉक्टर, इंजिनियर, वकील, पोलीस, फौजी, व या सारख्या अनेक सामाजिक कार्यातून आपली आगळी वेगळी ओळख निर्माण करून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या व्यक्तींच्या कार्याला प्रोत्साहन देऊन त्यांच्या जीवनात मानाचा तुरा लावणारा पुरस्कार वितरण व सन्मान सोहळा वसुनंदिनी फाऊंडेशन तर्फे आयोजित करण्यात येत आहे.

आपण करत असलेल्या कार्याचा आढावा घेऊन फाउंडेशन च्या निवड समितीकडून डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम राष्ट्रीय प्रेरणा पुरस्कार २०२६ करीता आपली निवड करण्यात आली असून हा पुरस्कार आपणास दिनांक ०५ एप्रिल २०२६ रोजी जळगाव येथील कार्यक्रमात अदा करण्यात येईल. आपले हार्दिक अभिनंदन व पुढील कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *