सुवर्णा कांचन मुख्य संपादक

पुणे : खेड शिवापूरजवळील गावडदरा येथील चाटे कॉलेजमध्ये नुकत्याच झालेल्या पुणे जिल्हास्तरीय वूशू स्पर्धेत अष्टापूर (ता. हवेली) येथील न्यू इंग्लिश स्कूलचा विद्यार्थी वेदांत गणेश गावडे याने उत्कृष्ट कामगिरी करत तृतीय क्रमांक पटकावला.

जिल्ह्यातील विविध शाळांमधील खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. चुरशीच्या लढतीत वेदांतने तांत्रिक कौशल्य, चपळाई आणि आत्मविश्वासाच्या जोरावर प्रतिस्पर्ध्यांना मात देत यश संपादन केले. त्याला मुख्याध्यापिका दिपाली दळवी, क्रीडा शिक्षक सुरेश ओंबळे, अनिल कुंजीर, अमर वारे तसेच शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

वेदांतच्या यशाबद्दल आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजयराव कोलते, सचिव शांताराम पोमण, सहसचिव गौरव कोलते, शाळा समितीचे अध्यक्ष श्रीहरी कोतवाल, यशवंत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सुभाष जगताप, नियामक मंडळाचे सदस्य रमेश कोतवाल यांच्यासह शाळा समितीच्या सदस्यांनी त्याचे अभिनंदन केले. या कामगिरीबद्दल अष्टापूर परिसरातूनही वेदांतवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

बापुराव चौधरी उपसंपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *