रामभाऊ आवारे, प्रतिनिधी

निफाड : पत्रकारिता क्षेत्रात तीन दशकांपासून अधिक काळ विविध वृत्तपत्रांच्या माध्यमातून पत्रकारिता करत असलेले तसेच अद्याप पावेतो अनेक राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले जेष्ठ पत्रकार, वारकरी संप्रदायाचे स्टार प्रचारक व प्रसारक ,द युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष, वारकरी मंच प्रदेश प्रसिद्धीप्रमुख, दैनिक युवा मराठा राज्य प्रसिद्धी प्रमुख, महानगर पत्रकार परिषद कार्यकारी सदस्य तसेच वनसगाव तालुका निफाड येथील रामभाऊ विठ्ठलराव आवारे सर यांना पत्रकारिता ,सामाजिक व जनहिताच्या कार्यातील उल्लेखनीय योगदानाबद्दल पुणे येथे आचार्य अत्रे सभागृह संत तुकाराम नगर पिंपरी चिंचवड येथे आयोजित चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळा समारंभात कलावंत दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.


पुणे येथे शिवछत्रपती महाराज जयंती दिनाचे औचित्य साधून चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळा आयोजन आचार्य आत्रे रंगमंच पिंपरी चिंचवड येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. पुरस्कार सोहळा कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक सुनील हिरुरकर असिस्टंट टू पोलीस कमिशनर पिंपरी चिंचवड,सुरेश पोखरकर एअर फोर्स (वायुसेना) टेक्निकल ऑफिसर राहुल शिंदे,स्टार माझा डायरेक्टर सुप्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी सोबतच निर्माता आणि दिग्दर्शक बाळासाहेब बांगर सर हे उपस्थित होते. आणि त्यांच्यासोबत उमेश बांदल, भाग्यदेव घुले ,अभिनेते प्रशांत तपस्वी ,देव झुंबरे, जगदीश संधानशिव,

अभिनेत्री काजल शिंदे हे सर्व पाहुणे उपस्थित होते. या सर्व पाहुण्यांच्या हस्ते संपूर्ण मान्यवरांचा आणि पुरस्कारार्थी यांचा सत्कार करण्यात आला व यांना पुरस्कार देण्यात आला स्वराज्य फिल्म प्रोडक्शन संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते शिवजयंती निमित्त १७० पुरस्कार वाटप करण्यात आले. स्वराज्य फिल्म प्रॉडक्शन संघटना महाराष्ट्र राज्य यांचा हेतू एकच आपल्या महाराष्ट्र मध्ये जेवढे पण गोरगरीब कलाकार आहेत, कवी आहेत, समाजसेवक आहेत यांना आपल्या महाराष्ट्रामध्ये समोर आणणे आणि त्यांना मानाचे स्थान मिळून देणे. या पुरस्कार सोहळ्यासाठी महाराष्ट्रभर मधून कलाकार मंडळी आली होते. या कार्यक्रमाचे आयोजक चित्रपट अभिनेते व दिग्दर्शक गिरीश सुदास राजुरकर तसेच उपाध्यक्ष राजेंद्र ठोंबरे, सचिव मंगेश कसबे आणि खजिनदार सिद्धार्थ शिंदे हे उपस्थित होते. सोबतच स्वराज्य फिल्म ची संपूर्ण टीम या कार्यक्रमाला उपस्थित होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *