रामभाऊ आवारे, प्रतिनिधी

निफाड : कामगार चळवळीचे झुंझार लढाऊ व्यक्तिमत्व तसेच जेष्ठ समाजसेवक लेखक, साहित्यिक, समीक्षक पी. के. पाटील यांचे वयाच्या ९३ व्या वर्षी निधन झाले.

त्यांच्याबद्दल थोडक्यात परिचय – मूळचे निफाड तालुक्यातील तारुखेडले गावचे रहिवाशी. त्यांचे वडील कै. कचेश्वर तुळशीराम आंधळे हे एक सुशिक्षित व्यक्तिमत्व व पंचक्रोशीत नावाजलेले घराणे. अशा घरात जन्मलेले पी. के. आण्णा पाटील जन्म ( १९३५ ) यांनी ही वडिलांचा वैचारिक वारसा घेहून वाटचाल सुरु केली. प्रारंभीक शिक्षण घेऊन नाशिक येथे पुढील शिक्षण साठी हॉस्टेल वर राहून पुर्ण केले.

दरम्यान, नोकरी ही केली. पुढील शिक्षण स्वतः जबाबदारी घेऊन केले व लेखक, सामाजिक, धार्मिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात पी.के. पाटील यांचे नाव परिचित झाले त्यांची आज पावते १६ पुस्तके प्रकाशित झाली. त्यांचे शालेय शिक्षण मनमाड नाशिक येथे झाले तसेच महाविद्यालयीन शिक्षण पुणे येथे झाले ते घरगुती अडचणीमुळे शिक्षण अर्धवट सोडून मुंबई येथे पी एस सी च्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन मुंबई येथे शासकीय सेवेत रुजू झाले नाशिक पुणे मुंबई येथे ते राष्ट्रसेवा दल समाजवादी पक्ष आणि कामगार संघटना याकडे आकर्षिले गेले.

या संघटना व पक्ष यांच्या क्रांती आणि राष्ट्रीय अधिवेशना निमित्त त्यांचा महाराष्ट्र आणि देशांतील प्रांतोप्रांती भटकंती झाली त्यातून आलेल्या अनुभवाच्या शिदोरीवर तसेच युरोप अमेरिका येथील कामगार क्षेत्रातील संमेलने आणि सेमिनारला त्यांनी हिंद मजदूर सभेचे प्रतिनिधित्व केले.

कामगार संघटन क्षेत्रात कार्यरत असताना त्यांनी कामगार हिताचे अनेक द्विपक्ष तसेच त्रिपक्ष करार व्यवस्थापनाशी केले आहेत इ.स.१९६४ ते आजतागायत त्यांनी कामगार आणि त्यांच्या संघटना यांच्या केसेस कामगार न्यायालय औद्योगिक न्यायालय वेज बोर्ड यांच्यासमोर दाखल करून चालविल्या आहेत त्यात कामगार व संघटना यांचे पक्षांत निर्णय मिळवले सामाजिक शैक्षणिक धार्मिक आणि राजकीय क्षेत्रात त्यांचा सक्रिय सहभाग होता तेथे आलेल्या जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीपणे पार पाडल्या. व सोबतच गोर गरीब कष्टाळू कामगारांच्या केसेस लढत राहिले. त्यांना न्याय देत असतांना स्वखर्चाने काही कामगारांच्या केसेस लडल्या. व न्याय मिळवून दिले.

त्यांच्या या लडाऊ, परोपकारी जीवनाचा सुखद अंत १६ फेब्रुवारी २०२६ रोजी झाला. व समाज एका महत्वकांशी, तत्ववादी, विचारवंत व्यक्तिमत्ववास पोरका झाला. त्यांचा जन्म हा एकादशी चा होता व मृत्यू हा महाशिवरात्री च्या रात्री पावन पर्वा वर झाला.त्यांच्या निष्ठावंत जीवन प्रवास कारकिर्द चा साक्षीदार म्हणून नियतीनेच जणू पावती दिली. असे संबोधले तर वावगे ठरणार नाही.

शब्दांकन – डॉ संदीप विनायक काकड नाशिक
(भाव माझ्या मनातले )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *