राज्य महिला आयोग अध्यक्षा रूपाली चाकणकर
संभाजी पुरीगोसावी, प्रतिनिधी
पुणे : पुणे रेल्वे स्टेशन परिसरांlत अवघ्या चार वर्षाच्या चिमुकलीला कुरकुरे देतो, असे म्हणत नेले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या प्रकरणी लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून यामध्ये आरोपीला अटक करण्यात आली आहे.

लोहमार्ग पोलिसांनी तातडीने सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता. एक व्यक्ती बालिकेला हात धरून प्लॅटफॉर्मच्या टोकाकडे नेताना दिसला त्यानंतर जीआरपी व आरपीएफ पथकांने रेल्वे परिसरांत शोध मोहीम राबवून आरोपींस बालिकेला ताब्यात घेतले, बालिकेने पोलिसांना सांगितले की काका कुरकुरे देतो, असे सांगून तिला घेवुन गेला होता, आणि तिच्यावर

अत्याचार केला. आईच्या फिर्यादीवरून आरोपी विरोधात पळून नेणे व लैंगिक अत्याचारांचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने राज्य महिला आयोगाच्या रूपाली चाकणकरांनी या घटनेचे गांभीर्यता लक्षात घेता आज पुणे रेल्वे महामार्ग पोलिसांसोबत महत्त्वपूर्ण बैठक घेतली.
या बैठकीत घटनेचा आढावा घेण्यात आला तसेच तपासाची सद्यस्थिती जाणून घेण्यात आली यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना काही महत्त्वांच्या सूचना दिल्या रेल्वे स्थानक परिसरांत सुरक्षा वाढवणे सीसीटीव्ही यंत्रणा, सक्षम करणे, गस्त वाढवणे, तसेच महिला व लहान मुलांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना राबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी तात्काळ अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, या घटनेची गांभीर्य दखल घेत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी आज रेल्वे पोलिसांसोबत महत्वपूर्ण बैठक घेतली त्यानंतर याबाबतही त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला आहे.