पुणे : समाज परिवर्तनाच्या लढ्यात आक्रमक भूमिका घेत ए बी एस क्रांती फोर्स ने मोठा संघटनात्मक निर्णय घेतला आहे. संघटनेच्या महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीत महत्त्वाच्या पदांवर नव्या नेतृत्वाची निवड करण्यात आली आहे.

यामध्ये सौ. पिंकी भागवत गायकवाड यांची पुणे जिल्हा अध्यक्षा म्हणून तर सौ. पूजा चंद्रकांत पवार यांची हवेली तालुका अध्यक्षा म्हणून अधिकृत निवड जाहीर करण्यात आली. ही निवड पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा उषाताई खिलारे यांच्या हस्ते पार पडली असून, यावेळी संघटनेत उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
या नियुक्त्या केवळ पदापुरत्या मर्यादित नसून, समाजाच्या न्याय, हक्क आणि सन्मानासाठी आक्रमकपणे लढण्याची जबाबदारी नव्या पदाधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे.

संघटनेच्या वर्तुळात असा विश्वास व्यक्त केला जात आहे की, नव्या नेतृत्वाच्या जोरावर ए बी एस क्रांती फोर्स ला नवसंजीवनी मिळेल आणि समाजकार्य अधिक वेगाने पुढे जाईल.
दोन्हीही पदाधिकाऱ्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे.