पुणे : “माझ्या वडिलांची मिराशी गा देवा! तुझी चरण सेवा पांडुरंगा!!” या संत तुकाराम महाराज यांच्या अभंगातील विचारांप्रमाणे वडील हे नि:स्वार्थ प्रेमाचे प्रतीक असून कुटुंबासाठी स्वतःचे आयुष्य पणाला लावणारे असतात, असे मत अखिल भारतीय वारकरी मंडळाचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष हभप आनंद महाराज तांबे यांनी व्यक्त केले.

हिंगणगाव (ता. हवेली) येथे कै. बापु निवृत्ती भिसे यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त आयोजित कीर्तन सेवेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी वडिलांच्या प्रेमाचे विविध भावनिक प्रसंग कीर्तनातून उलगडत उपस्थित श्रोत्यांची मने जिंकली.

ते पुढे म्हणाले, की वडील हा कुटुंबाचा खरा आधारस्तंभ असतो. मुला-मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवून जगणारा बाप त्यागाची मूर्ती असतो. त्यांचा वरकरणी कठोर स्वभाव हा मुलांना शिस्त लावण्यासाठी असला, तरी त्यांच्या अंतःकरणात प्रेमाचा अथांग सागर दडलेला असतो.

या प्रसंगी चिंतामणी यशवंत सहकारी साखर कारखान्याचे संचालक कुंडलिक थोरात, पखवाज वादक ओम महाराज दोडके, दरबारी गायक गजानन सोमटकर, वारकरी दादा जाधव, राहू गोरख थोरात, प्रा. सुरेश वाळेकर, मधुकर थोरात, किसन थोरात, काळुराम थोरात तसेच भिसे परिवारातील विठ्ठल भिसे, सुगंधा खरात, रतन थोरात, नंदा आवकीरकर, दीपक भिसे, रोहित भिसे, वंदना मारकड, आकाश भिसे, सुनील थोरात, मोहन गायकवाड, अक्षय चौधरी, अमोल भोसले, संतोष वेताळ यांच्यासह नातेवाईक, मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *