पुणे : पुणे-सोलापूर महामार्गावर कोरेगावमुळ (ता. हवेली) हद्दीत झालेल्या भीषण अपघातात एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना १ एप्रिल रोजी रात्री सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास अल्टाटेक फाट्याजवळ घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रकाश रमेश इंगळे (वय २८, रा. खैरेवाडी, शिवाजीनगर, पुणे) हे त्यांच्या ताब्यातील हिरो कंपनीची एचएफ डिलक्स (एमएच १२ व्हीई ५४४६) दुचाकीवरून जात असताना अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली.

अपघातानंतर संबंधित वाहनचालकाने कोणतीही वैद्यकीय मदत न करता घटनास्थळावरून पलायन केल्याचे समोर आले आहे.
या अपघातात इंगळे यांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला असून दुचाकीचेही मोठे नुकसान झाले आहे. याप्रकरणी सनी श्रीनिवास कांबळे (वय ३७, रा. एमएसईबी कॉलनी, अशोकनगर, शिवाजीनगर, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.

अज्ञात वाहनचालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०६(१), १२५(अ), १२५(ब), २८१, ३२४ तसेच मोटार वाहन कायद्यांतर्गत कलम १८४, १३४, १७७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उरुळी कांचन पोलिस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *