पुणे : अखिल भारतीय मराठा महासंघ, हवेली तालुका यांच्या नेतृत्वाखाली संघटना अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने विविध पदांवर महत्त्वपूर्ण नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. उरुळी कांचन शहर प्रमुखपदी भाऊसाहेब मोहन दौंडकर, तर यवत शहर प्रमुखपदी प्रदीप धोंडीबा खेसे पाटील यांची निवड करण्यात आली.

हवेली तालुका मराठा महासंघ व पुणे जिल्हा युवक अध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली या नियुक्त्या करण्यात आल्या. समाजकार्यातील सक्रिय सहभाग, प्रभावी वक्तृत्व आणि संघटन कौशल्य यांचा विचार करून या दोन्ही पदाधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपविण्यात आल्याचे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी युवकांना सामाजिक कार्यात सहभागी करून घेत समाजातील विविध घटकांना योग्य दिशा द्यावी, तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

आगामी काळात समाजहिताचे विविध प्रश्न त्यांच्या मार्गदर्शनाखाली मार्गी लागतील, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.
नियुक्तीपत्र वितरण कार्यक्रमाला पुणे जिल्हा युवक अध्यक्ष श्री दीपक गोते पाटील, हवेली तालुका अध्यक्ष श्री सुनील तुपे पाटील, कार्याध्यक्ष श्री भाऊसाहेब जगताप, सल्लागार श्री सचिन सुंबे, युवक अध्यक्ष श्री सचिन माथेफोड, उपाध्यक्ष श्री अनिरुद्ध मराठे, उपाध्यक्ष श्री चंद्रकांत दुंडे, सरचिटणीस श्री भाऊसाहेब जाधव, सदस्य श्री सुभाष कड, तसेच श्री अनिल जगताप, बापूसाहेब गोते पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

कार्यक्रमात नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *