पुणे : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने उरुळी कांचन पोलीस स्टेशन हद्दीत सापळा रचून एका फरार आरोपीस अटक केली. २ एप्रिल २०२६ रोजी पेट्रोलिंगदरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार कुंजीरवाडी फाटा परिसरात आरोपी लपून बसल्याचे निष्पन्न झाले.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या आदेशानुसार पथकाने तत्काळ कारवाई करत कोहिनूर विशाल पवार (वय २१, रा. महातोबा आळंदी, ता. हवेली, जि. पुणे) यास ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत तो यवत पोलिस स्टेशन येथील फरार आरोपी असल्याचे स्पष्ट झाले.

यवत पोलिस स्टेशनमध्ये त्याच्यावर विविध गुन्हे दाखल असून फरार यादी क्रमांक १७०९/२५ नुसार BNS कलम ३०५ व ३३१ अंतर्गत एकूण १२ गुन्ह्यांमध्ये तो फरार होता. खात्री करून त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून पुढील कार्यवाहीसाठी त्यास यवत पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल, अप्पर पोलिस अधीक्षक गणेश बिरादार, पोलिस उपअधीक्षक बापूराव दडस यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.

या कारवाईत सहायक पोलिस निरीक्षक राहुल गावडे, सचिन घाडगे, पोलिस हवालदार अजय घुले, चमन शेख, योगेश नागरगोजे, अजित भुजबळ, निलेश शिंदे व धीरज जाधव यांनी सहभाग घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *