बापुराव चौधरी, उपसंपादक

पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेवर गेल्या ६२ वर्षांपासून कार्यरत असलेल्या अधिकृत राष्ट्रीय राजकीय पक्षाच्या परंपरेला पुढे नेत, रिपब्लिकन प्रेसिडीयम पार्टी ऑफ इंडियाच्या नवीन शाखेचे उद्घाटन आज उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.

संविधानात्मक अशोक चक्रांकित निळा ध्वज आयताकृती स्वरूपात फडकवत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

या उद्घाटन सोहळ्याला पक्षाच्या राष्ट्रीय, राज्य तसेच जिल्हा पातळीवरील पदाधिकाऱ्यांची उपस्थिती लाभली. राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये श्री. प्रवीण भुजंगराव बडेकर (राष्ट्रीय अध्यक्ष), ऍड. प्रशांत भुजंगराव बडेकर (राष्ट्रीय महासचिव) आणि श्री. विनोद भाऊ बेंगळे (राष्ट्रीय कार्याध्यक्ष) यांची प्रमुख उपस्थिती होती.

राज्य कार्यकारिणीतून श्री. सतीश भाऊ चित्तापुरे (महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष) आणि श्री. महेंद्र एकनाथ शेलार (प्रदेश अपंग सेल अध्यक्ष) उपस्थित होते.

जिल्हा कार्यकारिणीतील विविध पदाधिकाऱ्यांमध्ये श्री. धनंजय भाऊ मापारे (हवेली तालुका अध्यक्ष), श्री. सचिन भाऊ मंचन (पिंपरी-चिंचवड शहर अध्यक्ष), श्री. संतोष कांबळे (शाखा अध्यक्ष), श्री. शुभम उत्तम लोंढे (उरुळी कांचन शहराध्यक्ष), श्री. बापूसाहेब पोळ, श्री. विजय सकट (शाखा अध्यक्ष), तसेच श्री. नितीन धावारे, श्री. अभिषेक गायकवाड, श्री. निरंजन गायकवाड, श्री. कपिल बुक्तर आणि श्री. तात्यासाहेब माटे (शाखा उपाध्यक्ष) यांची निवड जाहीर करण्यात आली.

कार्यक्रमादरम्यान तालुका कार्यकारिणी व स्थानिक कार्यकर्त्यांच्या निवडीचे आयोजन करण्यात आले. नव्याने निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांना पुढील कार्यासाठी मार्गदर्शन करताना, पक्षाची विचारधारा समाजाच्या सर्व घटकांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन करण्यात आले.

राष्ट्रीय अध्यक्ष प्रवीण भुजंगराव बडेकर, राष्ट्रीय कार्याध्यक्ष विनोद भाऊ बेंगळे तसेच प्रदेश अध्यक्ष सतीश चित्तापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.

उपस्थितांनी पक्षाच्या ध्येय-धोरणांप्रती निष्ठा व्यक्त करत सामाजिक परिवर्तनासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केला.

उद्घाटन सोहळ्यानिमित्त कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. भविष्यात पक्षाची संघटनात्मक ताकद अधिक वाढवून विविध सामाजिक प्रश्नांवर प्रभावीपणे काम करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *