सुवर्णा कांचन, मुख्य संपादक
पुणे : आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान, पुरंदर संचलित न्यू इंग्लिश स्कूल अष्टापूर विद्यालयाने मार्च २०२६ च्या माध्यमिक शालान्त (SSC) परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले. विद्यालयाचा एकूण निकाल ९८.३६ टक्के लागला असून, कु. ईश्वरी आप्पासाहेब जगताप हिने ८९.६० टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला.

विद्यालयाच्या गुणवत्तापूर्ण शैक्षणिक परंपरेला यंदाही विद्यार्थ्यांनी यशाची जोड दिली. विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमुळे विद्यालयाचा नावलौकिक अधिक वृद्धिंगत झाला आहे. गुणवत्ता यादीतील प्रथम पाच विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत :

१) कु. ईश्वरी आप्पासाहेब जगताप – ८९.६० टक्के
२) कु. अनुष्का महेश गायकवाड – ८६.८० टक्के
३) सोहम घनशाम जगताप – ८६.६० टक्के
४) कु. स्नेहल संदीप ढवळे – ८६.०० टक्के
४) कु. मयुरी प्रवीण शितोळे – ८६.०० टक्के
५) कु. स्वरांजली विष्णू चोरमले – ८४.५० टक्के
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष विजय कोलते, सचिव शांताराम पोमण तसेच सर्व पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे अभिनंदन केले. तसेच न्यू इंग्लिश स्कूल अष्टापूरच्या स्कूल कमिटीचे अध्यक्ष श्रीहरी कोतवाल, सर्व सदस्य, यशवंत सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सुभाष जगताप, संस्था नियामक मंडळाचे सदस्य रमेश कोतवाल, अष्टापूरच्या सरपंच पुष्पा कोतवाल, शाळा समन्वयक व माजी मुख्याध्यापक सुभाष काळे तसेच ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले.
विद्यालयाच्या मुख्याध्यापिका दीपाली दळवी, पर्यवेक्षक, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीने यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले.
बापुराव चौधरी, उपसंपादक