सुवर्णा कांचन, मुख्य संपादक
पुणे : फेब्रुवारी/मार्च २०२६ मध्ये झालेल्या इयत्ता दहावीच्या शालांत परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये पुरोगामी विद्यालय, नायगाव ता. हवेली या विद्यालयाचा निकाल ९६.८३ टक्के लागला असून इयत्ता दहावीच्या सेमी इंग्रजी वर्गाचा निकाल सलग १६ व्या वर्षी शंभर टक्के लागण्याची परंपरा कायम राहिली आहे.

या परीक्षेसाठी विद्यालयातून एकूण १५८ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी १५५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

परीक्षेत विद्यालयातील २२ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळविले, ४८ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ५८ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत, तर २५ विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. तसेच दोन विद्यार्थी एटीकेटीद्वारे इयत्ता अकरावीसाठी पात्र ठरले आहेत. विद्यालयाचा एकूण निकाल ९८.१० टक्के लागला आहे.

विद्यालयातील खालील विद्यार्थ्यांनी प्रथम पाच क्रमांक पटकावले आहेत :
१) जाधव राज तानाजी — ९३.८० टक्के
२) कुमारी आबनावे आर्या दत्तात्रय — ९१.०० टक्के
३) कुमारी गजधाने पूजा विजय — ८८.८० टक्के
४) बरडे सार्थक आप्पाराव — ८८.२० टक्के
५) घोडके अमित जयराम — ८७.०० टक्के
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन पुरोगामी शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे अध्यक्ष रंगनाथ चोरघे, उपाध्यक्ष रामदास बापू चौधरी, सचिव रंगनाथ आप्पा कड व सर्व विश्वस्त तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रवीण गायकवाड यांनी केले. तसेच सर्व विद्यार्थी, शिक्षक व पालकांचेही अभिनंदन करण्यात आले.
बापुराव चौधरी, उपसंपादक