सुवर्णा कांचन मुख्य संपादक

पुणे : पर्वती परिसरातील अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेचा पुणे शहर महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा स्वाती शिंदे यांनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. संबंधित आरोपीवर कठोर कारवाई करून ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यात यावी तसेच आरोपीस त्वरीत कठोर शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

या मागणीसंदर्भात पुणे शहर महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने लक्ष्मीनगर पोलीस चौकीच्या पोलीस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले. या वेळी स्वाती शिंदे यांच्यासह मनोरमा चौधरी, रेखा जैन, अंजली सोलापुरे, प्रविणा तांबोळी, कल्पना शिंदे, ज्योती अडागळे आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

महिला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी अल्पवयीन मुलींवरील वाढत्या अत्याचारांच्या घटनांबाबत चिंता व्यक्त करत दोषींना कठोर शिक्षा होणे आवश्यक असल्याचे नमूद केले.

बापुराव चौधरी उपसंपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *