सुवर्णा कांचन मुख्य संपादक

पुणे : दौंड तालुक्यातील भोंडवे वस्ती, कासुर्डी येथे रिपब्लिकन प्रेसिडीयम पार्टी ऑफ इंडियाच्या राष्ट्रीय पक्ष शाखेचे उद्घाटन मोठ्या उत्साहात आणि दिमाखात संपन्न झाले. यावेळी शाहू-फुले-आंबेडकर वाचनालय तसेच बुद्ध विहारासाठी नियोजित जागेचे उद्घाटनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमास पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रवीण भुजंगराव बडेकर, राष्ट्रीय कार्याध्यक्ष विनोद भाऊ बेंगळे, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सतीश चित्तापुरे, महाराष्ट्र राज्य अपंग सेलचे अध्यक्ष मोहन शेलार, तालुका अध्यक्ष धनंजय मापारे, उरुळी कांचन शहराध्यक्ष शुभम लोंढे, युवा नेते भाऊसाहेब बडेकर, संजय डिंबळे, तात्यासाहेब माटे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमात नव्या शाखेच्या पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर करण्यात आली. शाखाध्यक्षपदी सचिन बबन जाधव, उपाध्यक्षपदी महादेव ईश्वर भोसले, कार्याध्यक्षपदी रघुनाथ दिलीप चव्हाण, सचिवपदी निलेश सुनील कांबळे यांची निवड करण्यात आली. तसेच धीरज सोनवणे, नितीन सोनवणे, तेजस सोनवणे आणि अतिश सोनवणे यांची संघटक म्हणून नियुक्ती करण्यात आली.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी पक्षाचे ध्येय-धोरण आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार व प्रसार देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार व्यक्त केला. सामाजिक समता, शिक्षण आणि बौद्ध विचारसरणीच्या प्रसारासाठी कार्य करण्याची ग्वाही नव्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

कार्यक्रमास परिसरातील महिला माता-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

बापुराव चौधरी उपसंपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *