सुवर्णा कांचन मुख्य संपादक

पुणे : शहरासह ग्रामीण भागात वाढत चाललेल्या मॉडिफाय सायलन्सरचा त्रास, फॅन्सी नंबर प्लेटचा वापर आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरोधात उरुळी कांचन पोलिसांनी विशेष मोहीम राबवत दंडात्मक कारवाई केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या कारवाईत २७ वाहनचालकांवर कारवाई करून तब्बल २२ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

उरुळी कांचन परिसरात काही युवकांकडून बुलेटसह इतर दुचाकींना मॉडिफाय सायलन्सर बसवून मोठ्या आवाजात वाहन चालविण्याचे प्रकार वाढले होते. तसेच वाहनांवर नियमबाह्य फॅन्सी नंबर प्लेट लावून वाहतूक नियमांचे उल्लंघन होत असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे वारंवार येत होत्या. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी विशेष तपासणी मोहीम हाती घेतली.

या कारवाईदरम्यान मॉडिफाय सायलन्सर, फॅन्सी नंबर प्लेट, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता नसणे तसेच इतर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यात आली. नियम मोडणाऱ्या वाहनचालकांविरोधात मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात आली.

या मोहिमेत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रमेश भोसले, पोलीस हवालदार कमलेश होले, संतोष जाधव, उद्धव गायकवाड, प्रशांत पवार तसेच पोलीस कॉन्स्टेबल अश्वजीत मोहोळ, अमोल खांडेकर, शरद चव्हाण, प्रदीप बालगुडे आणि सुमित वाघ यांनी सहभाग घेतला.
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर यापुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे.

बापुराव चौधरी, उपसंपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *