सुवर्णा कांचन मुख्य संपादक
पुणे : चंदननगर पोलिस स्टेशन हद्दीत घडलेल्या सलग तीन घरफोडीच्या गुन्ह्यांचा छडा लावत पोलिसांनी एका सराईत आरोपीस अटक केली आहे. रफिक हुसेन शेख (वय ३२, रा. चितामणी नगर, गल्ली क्र. ३, सय्यद नगर, हडपसर, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

चंदननगर पोलिस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या गु.र.नं. ४७१/२०२५ भा. न्या. सं. कलम ३३१(३), तसेच गु.र.नं. १६९/२०२६ व १७०/२०२६ या घरफोडीच्या गुन्ह्यांचा तपास सुरू असताना तपास पथकाने घटनास्थळे व परिसरातील चौकांमधील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी केली. त्यावेळी तिन्ही गुन्ह्यांमध्ये एकाच व्यक्तीचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले.

त्यानंतर पोलिसांनी विविध सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेतला असता तो रफिक हुसेन शेख असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्याचा हडपसर परिसरात शोध घेऊन १२ मे २०२६ रोजी ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने तिन्ही घरफोडीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याला गु.र.नं. ४७१/२०२५ या गुन्ह्यात अटक करण्यात आली.
आरोपीने गुन्हे करण्यासाठी वापरलेली दुचाकीही पोलिसांनी जप्त केली असून पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक विकास बाबर करीत आहेत.
ही कारवाई पोलिस आयुक्त अमितेश गुप्ता, सह पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलिस आयुक्त मनोज पाटील, पोलिस उपआयुक्त सोमय मुंडे, सहायक पोलिस आयुक्त नुतन पवार व वरिष्ठ पोलिस निरीक्षक निलेश बहाया यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
तपास पथकातील सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश जगदाळे, विकास बाबर, महेश लामखेडे, पोलिस उपनिरीक्षक अमोल घोडके तसेच पोलीस अंमलदार मेमाणे, डांगे, मुलाणी, घुटे, कदम, पाटील, लहाणे व बेंद्रे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.
बापुराव चौधरी उपसंपादक