
सुवर्णा कांचन मुख्य संपादक
पुणे : डॉ. अण्णाभाऊ साठे क्रांती सेना पुणे जिल्ह्याची आढावा बैठक रविवारी (ता. २४) सायंकाळी ४ वाजता पश्चिम विभाग अध्यक्ष मा. श्री. राजाभाऊ अडागळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
बैठकीत अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण, साहित्यसम्राट डॉ. अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, तसेच मांग (मातंग) समाजाच्या विविध मागण्यांसाठी पावसाळी अधिवेशनापूर्वी पुणे ते मुंबई पदयात्रा आयोजित करण्याबाबत चर्चा करण्यात आली. ही पदयात्रा सचिन भाऊ साठे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात येणार असून, यात्रेच्या नियोजनासाठी पत्रकार परिषद घेणे तसेच पदयात्रेदरम्यान सचिन भाऊ साठे यांना पोलीस संरक्षण मिळावे, यासंदर्भातही बैठकीत विचारविनिमय झाला.

बैठकीस पश्चिम विभाग अध्यक्ष श्री. राजाभाऊ अडागळे, पश्चिम विभाग कार्याध्यक्ष श्री. पांडुरंग भिंगारदिवे, पश्चिम विभाग कोर कमिटी अध्यक्ष श्री. केरबा बाबर, पुणे जिल्हाध्यक्ष श्री. विलासरावजी झोंबाडे, पुणे शहराध्यक्ष श्री. मिथुन शिंदे, हवेली तालुका अध्यक्ष श्री. भारत लोणारी, हवेली तालुका सचिव श्री. चंद्रकांत गुरव, संभाजी राजे नेटके व सामाजिक कार्यकर्ते महेश राजगुरू उपस्थित होते.

यावेळी श्री. संतोष देशमुख यांची खेड तालुका अध्यक्षपदी, तर विकी अडागळे यांची पुणे जिल्हा संपर्कप्रमुखपदी निवड करण्यात आली.

डॉ. अण्णाभाऊ साठे क्रांती सेना पुणे जिल्हा कार्यकारिणीकडून पदयात्रेसाठी कोणत्या प्रकारचे सहकार्य करता येईल, याबाबत येत्या ३० तारखेला होणाऱ्या बैठकीत निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.
बापुराव चौधरी उपसंपादक