
सुवर्णा कांचन मुख्य संपादक
दौंड : बोरमलनाथ मंदिर येथे शनिवार, दि. २३ मे २०२६ रोजी आयोजित भिमथडी साहित्य संमेलनात संगीतकार शिवराज साने यांना प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. संगीत क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात आला.
विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

संमेलनाला दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल उपस्थित होते. संमेलनाचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ साहित्यिक सुरज पवार यांची निवड करण्यात आली होती. त्यांच्या हस्ते शिवराज साने यांना प्रशस्तिपत्र प्रदान करण्यात आले. संगीत क्षेत्रात केलेल्या योगदानाबद्दल तसेच सातत्यपूर्ण कार्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमात साहित्य, कला आणि सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. सैराट फेम अभिनेता प्रिन्स, प्रा. फ. शिंदे, ज्येष्ठ कवयित्री सुवर्णा वाघमारे तसेच सुप्रसिद्ध कवी प्रा. सुरेश वाळेकर यांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली. उपस्थित मान्यवरांनी साहित्य आणि संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल आपले मनोगत व्यक्त केले.

भिमथडी साहित्य संमेलनाचे आयोजन ज्येष्ठ साहित्यिक दशरथ यादव, संदेश सोनवणे आणि दिपक पवार यांनी केले होते. संमेलनामध्ये साहित्य, कला, संस्कृती आणि सामाजिक विषयांवर विविध मान्यवरांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला साहित्यप्रेमी, कलाकार आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वाती बंगळे यांनी केले. तर आभार प्रदर्शन सुवर्णा वाघमारे यांनी केले. संमेलनाच्या माध्यमातून साहित्य आणि कला क्षेत्रातील व्यक्तींना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करण्यात आला. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.
बापुराव चौधरी उपसंपादक