
सुवर्णा कांचन मुख्य संपादक
पुणे : नायगाव फाटा परिसरातील श्रेयस रोज नर्सरी येथून १६ वर्षीय मुलगा बेपत्ता झाल्याची घटना समोर आली असून, अज्ञात व्यक्तीने त्याचे अपहरण केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. याप्रकरणी उरुळीकांचन पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पियुष संदीप शिंदे (वय १६ वर्षे १० महिने) हा दि. २१ मे २०२६ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास नायगाव फाटा येथील श्रेयस रोज नर्सरी परिसरातील राहत्या खोलीतून कोणालाही काही न सांगता निघून गेला. त्यानंतर कुटुंबीयांनी त्याचा परिसरात शोध घेतला, मात्र तो अद्याप मिळून आलेला नाही.

याप्रकरणी पियुषचे वडील संदीप शामराव शिंदे (वय ४१, व्यवसाय मजुरी, रा. श्रेयस रोज नर्सरी, नायगाव फाटा, ता. हवेली, जि. पुणे) यांनी उरुळीकांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणावरून मुलाला पळवून नेले असावे, असा संशय फिर्यादीने व्यक्त केला आहे.
पियुष शिंदे याचे वर्णन असे : उंची सुमारे ४ फूट, रंग गोरा, अंगाने सडपातळ, अंगात पांढऱ्या रंगाचा शर्ट, निळ्या रंगाची जिन्स पॅन्ट, पायात निळ्या रंगाची सॅन्डल तसेच डोक्यावर जुन्या जखमेची खूण आहे.
या प्रकरणी उरुळीकांचन पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १३१/२०२६ अन्वये बीएनएस कलम १३७(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास उरुळी कांचन पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सचिन वांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक बापूसाहेब मत्रे करीत आहेत.
बापुराव चौधरी उपसंपादक