सुवर्णा कांचन मुख्य संपादक

पुणे, ता. ५ : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून इनोसन्ट टाईम्स स्कूल, पुणे यांच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. वाढते प्रदूषण आणि पर्यावरणासमोरील विविध आव्हाने लक्षात घेता समाजात पर्यावरणाबाबत जनजागृती निर्माण करणे तसेच वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनासाठी प्रेरणा देणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या प्राचार्या डॉ. अंकिता संघवी उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व विशद केले. “वृक्ष हे पृथ्वीचे खरे जीवनदाता असून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येकाने वृक्षारोपण करून त्यांचे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले.

या उपक्रमाचे नियोजन वनराई इको क्लबचे शिक्षक तथा आंतरराष्ट्रीय खेळाडू धनंजय मदने यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक व सर्व कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवून परिश्रम घेतले.

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित या उपक्रमामुळे पर्यावरण संरक्षणाचा संदेश समाजापर्यंत पोहोचला असून वृक्षसंवर्धनासाठी जनजागृती होण्यास मदत झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

बापुराव चौधरी उपसंपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *