सुवर्णा कांचन मुख्य संपादक

पुणे : नेपाळची राजधानी काठमांडू येथे नुकत्याच पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय युथ स्पोर्ट्स चॅम्पियनशिपअंतर्गत आयोजित आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत एंजल हायस्कूल, उरळी कांचनच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. या स्पर्धेत २५ देशांतील खेळाडूंनी सहभाग घेतला होता.

एंजल हायस्कूलचे चार विद्यार्थी या आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी पात्र ठरले होते. त्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत तीन सुवर्ण व एक रौप्य पदक पटकावून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. स्पर्धेत विवेक पांडे, श्रीतेज कांचन आणि सोहम शिंदे यांनी सुवर्णपदके मिळवली, तर रितेश चव्हाण याने रौप्य पदकाची कमाई केली.

विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे सचिव मा. श्री. सचिन अग्निहोत्री यांनी सर्व यशस्वी स्पर्धकांचे अभिनंदन केले. तसेच नेपाळमधील या स्पर्धेत मिळालेल्या यशाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. रीना देशमुख आणि प्रशिक्षक श्री. शकील शेख यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

या यशामुळे एंजल हायस्कूलच्या क्रीडा क्षेत्रातील गुणवत्तेची पुन्हा एकदा प्रचिती आली असून परिसरातून विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

बापुराव चौधरी उपसंपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *