सुवर्णा कांचन मुख्य संपादक

पुणे : टिळेकरवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी आज झालेल्या निवडणुकीत सुशील अशोक राऊत यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीमुळे गावात समाधानाचे वातावरण असून ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले.

सरपंच निवडीची प्रक्रिया शांततेत आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. निवडणूक कामकाजासाठी हवेली मंडलाधिकारी गीता काळे, तलाठी मुंडे तसेच ग्रामविकास अधिकारी प्रवीण खराडे यांनी प्रमुख जबाबदारी पार पाडत संपूर्ण प्रक्रिया नियमानुसार पूर्ण केली.

यावेळी गावातील ज्येष्ठ नेते राजेंद्र आबा टिळेकर, संतोष बापू टिळेकर, माजी सरपंच सुभाष बापू लोणकर, माजी सरपंच गणेश अण्णा टिळेकर, यशवंतचे संचालक मोहन बापू म्हेत्रे, उपसरपंच कल्पना टिळेकर, वैशाली चौरे, सुषमा टिळेकर, प्रियंका कांबळे, नंदा राऊत, अक्षय टिळेकर, नंदकुमार टिळेकर, सुभाष टिळेकर, बाबासाहेब टिळेकर, अशोकराव राऊत, रोहन कांबळे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष संतोष राऊत, उपाध्यक्ष कालिदास झगडे, राजू टिळेकर आणि रवींद्र लोणकर यांच्यासह ग्रामपंचायत पदाधिकारी, सदस्य, ग्रामस्थ आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

नवनिर्वाचित सरपंच सुशील राऊत यांनी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्राधान्याने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. ग्रामस्थांच्या सहकार्याने पायाभूत सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा तसेच विविध विकासकामे गतीने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.

बिनविरोध निवडीमुळे ग्रामपंचायतीत एकोपा आणि विकासाभिमुख वातावरण निर्माण झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी सुशील राऊत यांना शुभेच्छा देत त्यांच्या कार्यकाळात टिळेकरवाडीच्या विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.

बापुराव चौधरी उपसंपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *