सुवर्णा कांचन मुख्य संपादक

पुणे : पुणे रेल्वे स्थानक परिसरात वन्यजीवांची खरेदी-विक्री होणार असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर पुणे वनविभागाने सापळा रचून कारवाई केली. या कारवाईत आरोपी मल्हार लाला लोखंडे याच्याकडून ‘हत्ता जोडी’ (मॉनिटर लिझर्ड अर्थात घोरपडीचे सुकविलेले गुप्तांग) जप्त करण्यात आले. वनविभागाच्या पथकाने आरोपीला मुद्देमालासह रंगेहाथ ताब्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम, १९७२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वनविभागाने आरोपीची चौकशी केल्यानंतर त्याला अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने आरोपीची एक दिवसाची वनकोठडी मंजूर केली असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार वन्यप्राणी आणि पक्ष्यांना विशेष संरक्षण देण्यात आले आहे. वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ च्या अनुसूची क्रमांक १ मध्ये नमूद केलेल्या वन्यप्राण्यांशी संबंधित गुन्ह्यांसाठी किमान तीन वर्षे ते कमाल सात वर्षांपर्यंत कारावासाची तसेच किमान २५ हजार रुपयांच्या दंडाची तरतूद आहे.

ही कारवाई वनसंरक्षक (प्रादेशिक) आशिष ठाकरे, उपवनसंरक्षक अभिजीत वायकोस आणि सहाय्यक वनसंरक्षक विशाल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

वनपरिक्षेत्र अधिकारी नंदकिशोर पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही मोहीम राबविली. कारवाईत वनपरिमंडळ अधिकारी प्रमोद रासकर तसेच वनरक्षक अनिल राठोड, अंकुश कचरे, मधुकर गोडगे, श्रीराम जगताप आणि ओंकार गुंड यांनी सहभाग घेतला.


वन्यजीवांची अवैध तस्करी आणि व्यापार रोखण्यासाठी वनविभागाकडून अशा कारवाया सातत्याने सुरू असून नागरिकांनीही संशयास्पद हालचालींबाबत तातडीने माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बापुराव चौधरी उपसंपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *