
सुवर्णा कांचन मुख्य संपादक
पुणे : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने नवीन एस.टी. बससाठी एनसीएमसी (नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड) स्मार्ट कार्ड नोंदणी शिबिराचे आयोजन उरुळी कांचन येथील पांढरस्थळ वस्ती, जिल्हा परिषद शाळेजवळ करण्यात आले. शुक्रवार (दि. ३१ जुलै) आणि शनिवार (दि. १ ऑगस्ट) रोजी सकाळी ९.३० ते सायंकाळी ४ या वेळेत आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

शिबिराच्या आयोजनासाठी प्रताप आप्पा मारुती कांचन यांनी पुढाकार घेतला. ते श्री काळभैरव सेवा समितीचे उपाध्यक्ष तसेच हवेली तालुका युवासेनेचे प्रमुख आहेत. या उपक्रमात स्थानिक नागरिकांना स्मार्ट कार्ड काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. दोन दिवस चाललेल्या शिबिरामध्ये सुमारे २७० ते ३०० नागरिकांनी नवीन एनसीएमसी स्मार्ट कार्ड काढून या सुविधेचा लाभ घेतला.

शिबिराला दत्तात्रय आबुराव कांचन, बाळासाहेब काशिनाथ कांचन, संजय नामदेव कांचन, संभाजी बबन कांचन, रशीद मोहम्मद शेख, शिवाजी नाना कांचन, महेंद्र ज्ञानोबा कांचन, संजय हरिबा ठावरे, प्रवीण शिवाजी वाघमोडे, निलेश अशोक कांचन, गणेश जगन्नाथ कांचन आणि सोनू विठ्ठल कांचन, संदिप कांचन, संकेत कांचन, प्रतिक कांचन, प्रसाद लोंढे, प्रज्योत वाघमोडे यांची उपस्थिती लाभली. तसेच शिवतेज तरुण मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सर्व सभासदांनीही शिबिरात सहभाग नोंदवून आयोजनास सहकार्य केले.

या शिबिराचे आयोजन प्रताप आप्पा कांचन आणि सोनम प्रताप कांचन यांनी केले. ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या परिसरातच स्मार्ट कार्ड मिळण्याची सुविधा उपलब्ध झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. भविष्यातही अशा प्रकारचे उपक्रम सातत्याने राबविण्यात यावेत, अशी अपेक्षा उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली.

या शिबिरामुळे नागरिकांचा वेळ आणि प्रवासाचा खर्च वाचण्यास मदत झाली असून, एस.टी. महामंडळाच्या डिजिटल सेवा ग्रामीण भागापर्यंत प्रभावीपणे पोहोचत असल्याचे या उपक्रमातून दिसून आले.
बापुराव चौधरी उपसंपादक
