सुवर्णा कांचन मुख्य संपादक

पुणे : क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय, प्रेरणादायी आणि सातत्यपूर्ण योगदानाबद्दल अ‍ॅथलेटिक्स क्षेत्रातील मान्यवर व्यक्तिमत्त्व श्री. धनंजय मदने यांना ‘जपान कराटे-डो ननबुकई शितो रिओ इंडिया’ तर्फे विशेष गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुण्यात उत्साहपूर्ण आणि दिमाखदार वातावरणात पार पडलेल्या भव्य सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून देश, राज्य आणि समाजाचे नाव उंचावणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यासाठी या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या सोहळ्यास कबड्डी क्षेत्रातील अर्जुन पुरस्कार विजेते मा. शांताराम बापू जाधव, ज्येष्ठ कवी म. भा. चव्हाण, ‘जपान कराटे-डो ननबुकई शितो रिओ इंडिया’चे अध्यक्ष मा. राजू थापा तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेस पुणे शहराध्यक्ष मा. किशोर कांबळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. यावेळी आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग पंच डॉ. मदन कोठुळे आणि मनोहर ताठवडकर यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.

पुरस्कार स्वीकारल्यानंतर भावना व्यक्त करताना धनंजय मदने म्हणाले, “हा सन्मान माझ्यासाठी अत्यंत अभिमानास्पद आणि प्रेरणादायी आहे. ‘जपान कराटे-डो ननबुकई’ संस्थेचे तसेच उपस्थित सर्व मान्यवरांचे मी मनःपूर्वक आभार मानतो. या गौरवामुळे भविष्यात क्रीडा क्षेत्रात अधिक जोमाने कार्य करण्याची प्रेरणा मिळाली आहे.”
युवा पिढीला प्रेरणा देणारा आणि क्रीडा संस्कृतीला नवी दिशा देणारा हा सोहळा ठरला. कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन मा. सोनु भैया ठक्कर आणि मा. युवराज दिसले यांनी केले.

कार्यक्रमास मोठ्या संख्येने खेळाडू, प्रशिक्षक, पालक आणि क्रीडाप्रेमी उपस्थित होते.

बापुराव चौधरी उपसंपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *