बापुराव चौधरी, उपसंपादक

पुणे : महात्मा गांधी सर्वोदय संघ संचलित पद्मश्री मणिभाई देसाई महाविद्यालयाच्या ‘आम्ही मणिरत्न’ माजी विद्यार्थी संघ, प्लेसमेंट विभाग आणि विप्ला फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महिनाभराच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ड्राइव्हमधून आठ विद्यार्थिनींची नामांकित कंपन्यांत निवड झाली आहे.

संगणक शास्त्र विभागातील तृतीय वर्ष बीसीए वर्गातील अंकिता नामदेव नातू, साक्षी राजेंद्र धवळे, आर्या नवनाथ नागवडे व गौरी बाळू शेंडगे यांची हडपसर येथील गार्गी एंटरप्रायझेसमध्ये निवड झाली. तसेच वाणिज्य विभागातील तृतीय वर्षातील पूर्वा बाळासाहेब कुंजीर, वर्षा ज्ञानेश्वर सोनवणे, भारती महादेव चौधरी व ऋग्वेदी संभाजी कदम यांची आकुर्डी (पिंपरी-चिंचवड) येथील महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीत निवड झाली आहे.

हडपसर येथे आयोजित प्लेसमेंट ड्राइव्हमध्ये विद्यार्थिनींना नेमणूक आदेश देण्यात आले असून, त्या परीक्षा संपल्यानंतर रुजू होणार असल्याची माहिती प्राचार्य डॉ. शिवाजी बोऱ्हाडे यांनी दिली.
फेब्रुवारी ते मार्च दरम्यान आयोजित या उपक्रमात एकूण ५१ विद्यार्थिनींनी सहभाग घेतला.

प्रशिक्षिका स्नेहल कांबळे व धनश्री शेळके यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. सहभागींना प्रमाणपत्रांचे वितरण प्राचार्य डॉ. बोऱ्हाडे यांच्या हस्ते करण्यात आले.

या उपक्रमाचे नियोजन ‘आम्ही मणिरत्न’ माजी विद्यार्थी संघाच्या समन्वयक प्रा. अनुप्रिता भोर व प्लेसमेंट विभागाच्या समन्वयक प्रा. गौरी ताकवणे यांनी केले. यशस्वी विद्यार्थिनींचे संस्थेचे उपाध्यक्ष प्रा. के. डी. कांचन, सचिव सोपानराव कांचन, खजिनदार राजाराम कांचन व अन्य विश्वस्तांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *