बापुराव चौधरी, उपसंपादक

पुणे : संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातून साकारलेले हे राज्य कष्टकरी, शेतकरी आणि कामगारांच्या श्रम, स्वाभिमान आणि जिद्दीचे प्रतीक आहे. उद्योग, शेती आणि सामाजिक चळवळींच्या बळावर उभा राहिलेला महाराष्ट्र हा प्रगती, समता आणि अस्मितेचा भक्कम पाया आहे. त्यामुळे कामगार, शेतकरी व कष्टकरी वर्गाच्या हक्कांच्या संरक्षणासाठी आपण कटिबद्ध राहिले पाहिजे, असे प्रतिपादन सम्राट कामगार संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब बडेकर यांनी केले.

सम्राट कामगार संस्थेच्या वतीने कामगार दिनानिमित्त (१ मे) विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. यानंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. तसेच ज्येष्ठ कामगारांचा विशेष सन्मान करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमात चिंतामणी हॉस्पिटलच्या वतीने आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरामध्ये बीपी, शुगर, नेत्र तपासणी आदी आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या. कामगारांनी मोठ्या संख्येने या शिबिराचा लाभ घेतला. याशिवाय कामगारांसाठी स्वस्त दरात अपघात विमा पॉलिसीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली, ज्याला चांगला प्रतिसाद मिळाला.

कार्यक्रमाला सरपंच मिलिंद जगताप, माजी उपसरपंच दत्तात्रय कांचन, चिंतामणी यशवंत सहकारी साखर कारखान्याचे संचालक संतोष कांचन, पंचायत समितीचे माजी सदस्य काळुराम मेमाणे, माजी सरपंच संतोष कांचन, भाऊसाहेब कांचन, माजी उपसरपंच सुनिल दत्तात्रय कांचन, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष महादेव कांचन, ग्रामपंचायत सदस्य सुनिल तांबे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रामदास तुपे, माजी ग्रामपंचायत सदस्य धनराज टिळेकर, भैरवनाथ सेवा समितीचे उपाध्यक्ष प्रताप कांचन, युवा नेते शुभम काळे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडिया प्रमुख संदिप कांचन, सामाजिक कार्यकर्ते संतोष गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.

तसेच संस्थेचे उपाध्यक्ष आप्पा वाघमोडे, दादा खाडे, व्यंकट वाघमारे, गोरख परबळकर, अमर पोतेकर, समाधान तुपेरे, सुमित सोनवणे यांच्यासह ‘महा सुपरफास्ट न्यूज’च्या संपादिका सुवर्णा कांचन, उपसंपादक बापुराव चौधरी, पत्रकार अमोल भोसले, पत्रकार सुनिल तुपे व इतर अनेक सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. उमाजी नाईक महिला बचत गट व सम्राट महिला बचत गटाच्या अध्यक्षा तसेच महिला सभासदांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार सदाशिव कांबळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन संतोष सोनवणे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *