सुवर्णा कांचन मुख्य संपादक

लोणी काळभोर : वेटलिफ्टिंग संघटना पुणे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य जिल्हास्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत लोणी काळभोर येथील सह्याद्री स्पोर्ट अँड फिटनेस सेंटरच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले. हरीभाई देसाई कॉलेज, पुणे येथे रविवार (दि. १५ नोव्हेंबर) रोजी पार पडलेल्या या स्पर्धेत सह्याद्रीच्या १८ खेळाडूंनी सहभाग घेतला होता. त्यापैकी आठ खेळाडूंची सांगली येथे दि. २० ते २२ नोव्हेंबरदरम्यान होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

या जिल्हास्तरीय स्पर्धेत पुणे जिल्ह्यातील एकूण १३५ खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. १२, १४ आणि १७ वर्षांखालील विविध वयोगटांत झालेल्या या स्पर्धेत सह्याद्री स्पोर्ट अँड फिटनेस सेंटरच्या खेळाडूंनी आपल्या कौशल्याची चुणूक दाखवत पदकांची कमाई केली. या यशामुळे लोणी काळभोर परिसरातील क्रीडाप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

स्पर्धेत मंजिरी अमित बोळे, जान्हवी सुहास पाटील, त्रिशा सुधीर काळभोर, रिजा आसिफ शेख, साईराज दीपक भुजबळ, नेत्रा भागवत थोरात, आर्या अण्णाराव गायकवाड आणि सार्थक ज्ञानदेव इंदलकर यांनी सुवर्णपदक पटकावले. ओवी अमर गिरी, सिद्धी संतोष गावडे, नंदिनी जालिंदर काळभोर, तन्वी गणेश अंबिके आणि कृष्णा सागर पेटारे यांनी रौप्यपदक मिळविले. तर आरोही विपुल पवार, आराध्या संदीप भोसले आणि ऋषिकेश हनुमंत सहाने यांनी कांस्यपदकावर आपले नाव कोरले. कार्तिकी प्रदीप शेडगे आणि अरमान दगडूशेठ यांनीही स्पर्धेत सहभाग नोंदविला.


या सर्व खेळाडूंना सह्याद्री स्पोर्ट अँड फिटनेस सेंटरचे मार्गदर्शक गणेश विठ्ठल नगीने, अमर गणपत गिरी आणि नरेश गणपत गिरी यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या सातत्यपूर्ण प्रशिक्षणामुळे खेळाडूंनी जिल्हास्तरावर उल्लेखनीय यश मिळविले असून आता राज्यस्तरीय स्पर्धेतही चमकदार कामगिरी करण्याची संधी त्यांना मिळणार आहे.

या यशाबद्दल महाराष्ट्र राज्य वेटलिफ्टिंग संघटनेचे अध्यक्ष सुधीर म्हाळसकर, सचिव प्रशांत बेंद्रे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपसंचालक तुषार नामदेव दौंडकर, महाराष्ट्र केसरी पैलवान राहुल काळभोर, अभिनव चेतना मंडळाचे अध्यक्ष हेमंत सोपानराव हाडके, वि. वि. का. सोसायटी लोणी काळभोरचे चेअरमन रमेश यशवंत भोसले, हवेली तालुका वेटलिफ्टिंग संघटनेचे अध्यक्ष योगेश ज्ञानेश्वर उबाळे, सामाजिक कार्यकर्ते संतोष बाबुराव भोसले, सुधीर काळभोर, तुषार कुंभार आणि मयूर चांदणे यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले.


ग्रामीण भागातील खेळाडूंना योग्य प्रशिक्षण आणि संधी मिळाल्यास ते राज्यस्तरावरही आपली गुणवत्ता सिद्ध करू शकतात, हे सह्याद्री स्पोर्ट अँड फिटनेस सेंटरच्या खेळाडूंनी आपल्या कामगिरीतून दाखवून दिले आहे. राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंना मान्यवरांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

बापुराव चौधरी उपसंपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *